Agriculture News in Marathi Stock limit decision No implementation in the state | Agrowon

साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात अंमलबजावणी नको

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

केंद्र सरकारने गरज नसताना सोयाबीन काढणीच्या ऐन हंगामात खाद्यतेल व तेलबियांवर साठा मर्यादेचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दुर्देवी असून, या एका निर्णयाने सोयाबीन व इतर तेलबियांचे बाजारभाव पडणार आहे.

हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज नसताना सोयाबीन काढणीच्या ऐन हंगामात खाद्यतेल व तेलबियांवर साठा मर्यादेचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दुर्देवी असून, या एका निर्णयाने सोयाबीन व इतर तेलबियांचे बाजारभाव पडणार आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान  होणार आहे. त्यामुळे हा शेतकरी विरोधी निर्णय केंद्र सरकारने तातडीने रद्द करावा, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी केली आहे. 

केंद्र सरकार एकीकडे तीन कृषी कायदे आणून शेतीमालाचा बाजार खुला करण्याचे दिशेने पाऊल टाकते आणि दुसरीकडे आवश्यकता नसताना देशात बंदी असलेल्या जीएम बियाण्यांची सोयापेंड आयात करते.

खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या नावावर आयात शुल्क कमी करून सोयाबीनचे आणि तेलबियांचे भाव पाडले. पण बाजारातील खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या नाहीत. आता साठा मर्यादेचा निर्णय घेतला आहे. बाजारात, व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोयाबीनचे आणि तेलबियांचे भाव पाडण्याचा दुर्दैवी निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे. केंद्राच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करतो आणि राज्यातील भाजप खासदार आणि आमदारांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत करून एकतर मोदीभक्ती दाखवावी किंवा जाहीर निषेध व्यक्त करून शेतकरी प्रेम व्यक्त करावे. 

या साठा मर्यादेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या खाद्यतेल व तेलबिया साठेबंदीच्या निर्णयाचा विरोध करून या निर्णयाची राज्यात अमंलबजावणी करणार नाही, किंवा असलेली मर्यादा दुप्पटीने करण्यात येईल, अशी घोषणा करावी. बाजारातील भीतीचे वातावरण संपवून, सोयाबीनचे व तेलबियांचे बाजारभाव पडणार नाहीत, यासाठी बाजारातील सर्व घटकांना आश्‍वासित करावे, अशी मागणी हरणे यांनी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...