चांगल्या बाजारभावाच्या संधीसाठी कांदाचाळ हवीच..!

कांदा साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. साठवणगृहात आर्द्रता अधिक असल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कांदा सडतो. तर आर्द्रता जास्तच कमी (६५ टक्क्यांपेक्षा कमी) झाल्यास कांद्याचे उत्सर्जन वाढून वजनात घट येते.
onion storage
onion storage

कांदा साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. साठवणगृहात आर्द्रता अधिक असल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कांदा सडतो. तर आर्द्रता जास्तच कमी (६५ टक्क्यांपेक्षा कमी) झाल्यास कांद्याचे उत्सर्जन वाढून वजनात घट येते. सध्या कांद्याला चांगला बाजार मिळत नसल्यामुळे सुधारित पद्धतीच्या कांदा चाळींची उभारणी करून चार ते सहा महिने कांद्याची साठवण केल्यास जास्त बाजारभाव मिळू शकतो.  कांदा साठवणगृहाचे नैसर्गिक हवादार कांदाचाळी व शीतगृहे (कोल्ड स्टोरेज) असे दोन प्रकार आहेत. शीतगृहामध्ये ५ अंश सेल्सिस तापमानापेक्षा कमी तापमानात कांदा टिकतो. परंतु शीतगृहातून कांदा बाहेर काढल्यानंतर लगेच कोंब येण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्याचे बाजारमुल्य कमी होते. तसेच शीतगृह उभारणीसाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे कमी खर्चाच्या नैसर्गिक हवादार कांदाचाळींची उभारणी करणे फायद्याचे ठरते. सुधारित नैसर्गिक हवादार कांदाचाळी एक पाखी व दोन पाखी अशा दोन प्रकारच्या असतात. साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. साठवणगृहात आर्द्रता अधिक असल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कांदा सडतो. तर आर्द्रता जास्तच कमी (६५ टक्क्यांपेक्षा कमी) झाल्यास कांद्याचे उत्सर्जन वाढून वजनात घट येते. एक पाखी साठवणगृह

  • हे साठवणगृह एक पाखी, कौलारु किंवा पन्हाळी पत्र्याचे छत असलेले बसक्या स्वरूपाचे असते. एक किंवा दोन एकर कांदा उत्पादनाच्या साठवणूकीकरीता एक पाखी चाळी उपयुक्त आहेत. या चाळी जमिनीलगत उभारुन कांद्याची साठवण केली जात असल्यामुळे तळाशी हवा खेळती न राहिल्याने कांदा सडतो.
  • राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने अशा चाळीमध्ये सुधारणा करुन तळाशी हवा खेळती राहणाऱ्या व पाख्याची लांबी जास्त असलेल्या चाळींची रचना केली आहे.
  • उभारणी 

  •  एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर दिशेने करावी. पूर्व-पश्‍चिम रचना केली तर वायुवीजन व्यवस्थित होत नाही व सड वाढते. 
  • चाळीची आतील रुंदी ४ फूट व गरजेनुसार लांबी २० ते ३० फूट ठेवावी. तळाशी २ फूट मोकळी जागा ठेवून अधांतरी तळाची योजना करावी. चाळीची मध्यावरील उंची ७.५ फूट तर बाजूची उंची ५ फूट असावी. 
  • छप्पर कौलारु, ॲसबेसटॉस पत्रे किंवा उसाच्या पाचटाचे असावे. बाजू व तळाशी लाकडी पट्ट्या किंवा बांबूचा वापर करावा. कौलारु किंवा ॲसबेसटॉस पत्र्यामुळे खर्च वाढतो. त्यामुळे उसाचे पाचट छप्परासाठी वापरल्यास खर्च कमी होतो. छप्पर दर तीन वर्षांनी बदलावे किंवा त्याची दुरुस्ती करावी. उसाच्या पाचटाने शाकारलेल्या साठवणगृहात तापमान व आर्द्रता कमी राहते व त्यामुळे सड कमी होते.
  • तपशील एक पाखी साठवणगृह दोन पाखी साठवणगृह
    साठवण क्षमता (टन) ५ टन १० टन २५ टन ५० टन
    चाळ उभारणीची दिशा दक्षिणोत्तर दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम
    लांबी X रुंदी X बाजूची उंची X मधील उंची (फूट) १५ x ४ x ५ x ७.५ ३० x ४ x ५ x ७.५ ४० x १२ x ६ x १० ८० x १२ x ६ x १०
    मधील मोकळ्या जागेची रुंदी(फूट) - -
    तळाची जमिनीपासूनची उंची (फूट)
    साठवण क्षमता (घन मीटर) १८ ४२ ८४
    चाळीचे अपेक्षित आयुष्य २० २० २० २०

    दोन पाखी साठवणगृह  या साठवणगृहाची रचना पूर्व-पश्चिम करावी. साठवणगृहाची लांबी ३० ते ५० फूट असावी (५० फूटापेक्षा जास्त असू नये). लांबी जास्त ठेवल्यास कांदा सडण्याचे प्रमाण वाढते.  उभारणी 

  • साठवणगृह दोन पाखी असावे. एका पाखीची रुंदी ४ फूट तर साठवणगृहाची रुंदी १२ फूट असावी. दोन पाख्यांच्यामध्ये वावरण्यासाठी ४ फूट मोकळी जागा ठेवावी. जमिनीपासून तळाची उंची २ फूट ठेवावी म्हणजे तळ अधांतरी राहील. तळ व बाजू लाकडी पट्ट्याने किंवा बांबूने बनवाव्यात. अधांतरी तळासाठी लोखंडी पाईप किंवा सिमेंट पट्ट्यांचा वापर करु नये. दोन पट्ट्यांमध्ये लहान कांदे पडणार नाहीत इतकी एक ते दीड इंच मोकळी जागा ठेवावी. त्यामुळे वायुवीजन चांगले होते. 
  • साठवणगृहाचे छप्पर ॲसबेसटॉसचे असावे. लोखंडी पत्रे वापरल्यास साठवणगृहातील तापमान वाढते. छपराचे पत्रे बाजूच्या भिंतीच्या ३ फूट पुढे आलेले असावेत, त्याला पाख्या असे म्हणतात. पाख्या लांब ठेवल्यामुळे पावसाचे पाणी लागून कांदा भिजत नाही व सड कमी होते. छताचा कोन २२ अंश इतका असावा.
  • साठवणगृहाची मध्यावरील उंची अधांतरी तळापासून ८ फूट तर बाजूची उंची ६ फूट असावी. कांदा भरण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी प्रत्येक कप्प्याला झडपा असाव्यात. 
  • पाखीमध्ये कांदा भरल्यानंतर त्याच्यावर किमान दोन फूटाची मोकळी जागा ठेवावी. अंतर कमी राहिल्यास हवेचे चलनवलन व्यवस्थित होत नाही व त्यामुळे कांद्याची सड वाढते. 
  • साठवणगृहाच्या मागील बाजूवरील त्रिकोणी भागातून व दरवाजामधून पाऊस आत जावू नये, यासाठी पत्र्याचा भाग पुढील बाजूने वाढवावा किंवा त्याजागी हिरव्या शेडनेटची जाळी बसवावी.
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा चाळी उभारणीकरिता शासनातर्फे  प्रती टन ३५०० रुपये अनुदान देण्यात येते. अनुदान प्राप्तीसाठी हवा खेळती राहणाऱ्या चाळी उभारणे आवश्यक आहे. चाळींचा आराखडा व त्यास लागणारे साहित्य कृषी खाते, पणन मंडळ आणि कांदा व लसूण संशोधन संचालनालय यांनी एकत्रित बैठकीत मान्य केल्याप्रमाणे असणे बंधनकारक आहे. योजनेबाबत सविस्तर माहितीसाठी आपल्या विभागातील कृषी अधिकारी किंवा बाजार समिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. संपर्क - डॉ. राजीव काळे, ९५२१६७८५८७ (कांदा व लसूण संशोधन संस्था, राजगुरूनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com