पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार मेट्रीक टनावर साठा

पुणे: ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी शासकीय धान्य गोदामात १७ हजार ९३९ मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे,’’ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
Stocks of grain over 17.5 thousand metric tons in the Pune region
Stocks of grain over 17.5 thousand metric tons in the Pune region

पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी शासकीय धान्य गोदामात १७ हजार ९३९ मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे,’’ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

मार्केटमध्ये विभागात १८ हजार ६६६ मेट्रिक टन अन्न-धान्याची, तर १५ हजार १८८ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. पुणे जिल्हयात ३ हजार ८४८ मेट्रिक टन, सातारा जिल्हयात चार हजार १२९, सोलापूर जिल्हयात तीन हजार ६८, सांगली जिल्हयात दोन हजार ९९३, तर कोल्हापूर जिल्हयात तीन हजार ८९९ मेट्रिक टन धान्यसाठ्याची आवक झाली आहे. 

पुणे विभागात १५ हजार १८८ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. यात पुणे जिल्हयात नऊ हजार ७३९ क्विंटल, सोलापूर जिल्हयात एक हजार २०६ क्विंटल, कोल्हापूर जिल्हयात ८०३ क्विंटल, सांगली जिल्हयात ४४६ क्विंटल, सातारा जिल्हयात दोन हजार ९९४ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. विभागात तीन हजार २६१ क्विंटल फळांची, तसेच १६ हजार ३८९ क्विंटल कांदा, बटाटयांची आवक झाली आहे. विभागात १८ हजार ६६६ क्विंटल अन्नधान्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे.  अन्न-धान्याबाबत यांच्या साधा संपर्क 

अन्न-धान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबंधित जिल्हयातील खालील अधिकाऱ्यांशी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड ०२०-२६०६१०१३ अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे ०२० -२६१२३७४३, सातारा जिल्हा जिल्हा पुरवठा  अधिकारी स्नेहल किसवे ०२१६२ - २३४८४०, सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे ०२३३- २६००५१२, कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके ०२३१ - २६५५७९, सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांच्याशी ०२१७ -२७३१००३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com