Agriculture news in marathi Stocks of grain over 17.5 thousand metric tons in the Pune region | Agrowon

पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार मेट्रीक टनावर साठा

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी शासकीय धान्य गोदामात १७ हजार ९३९ मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे,’’ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी शासकीय धान्य गोदामात १७ हजार ९३९ मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे,’’ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

मार्केटमध्ये विभागात १८ हजार ६६६ मेट्रिक टन अन्न-धान्याची, तर १५ हजार १८८ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. पुणे जिल्हयात ३ हजार ८४८ मेट्रिक टन, सातारा जिल्हयात चार हजार १२९, सोलापूर जिल्हयात तीन हजार ६८, सांगली जिल्हयात दोन हजार ९९३, तर कोल्हापूर जिल्हयात तीन हजार ८९९ मेट्रिक टन धान्यसाठ्याची आवक झाली आहे. 

पुणे विभागात १५ हजार १८८ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. यात पुणे जिल्हयात नऊ हजार ७३९ क्विंटल, सोलापूर जिल्हयात एक हजार २०६ क्विंटल, कोल्हापूर जिल्हयात ८०३ क्विंटल, सांगली जिल्हयात ४४६ क्विंटल, सातारा जिल्हयात दोन हजार ९९४ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. विभागात तीन हजार २६१ क्विंटल फळांची, तसेच १६ हजार ३८९ क्विंटल कांदा, बटाटयांची आवक झाली आहे. विभागात १८ हजार ६६६ क्विंटल अन्नधान्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. 

अन्न-धान्याबाबत यांच्या साधा संपर्क 

अन्न-धान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबंधित जिल्हयातील खालील अधिकाऱ्यांशी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड ०२०-२६०६१०१३ अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे ०२० -२६१२३७४३, सातारा जिल्हा जिल्हा पुरवठा 
अधिकारी स्नेहल किसवे ०२१६२ - २३४८४०, सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे ०२३३- २६००५१२, कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके ०२३१ - २६५५७९, सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांच्याशी ०२१७ -२७३१००३ या क्रमांकांवर संपर्क साधावा. 
 


इतर बातम्या
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...