किराणा दुकानातून मिळाला एचटीबिटीचा साठा

गडचिरोली ः चामोर्शी तालुक्‍यातील सोमनपल्ली येथील एका किराणा दुकानातून स्वस्त धान्य दुकानातील तांदुळासह एचटीबिटी बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त बियाण्याची किंमत २९ हजार २२५ रुपये असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
Stocks of HTBT found in grocery stores
Stocks of HTBT found in grocery stores

गडचिरोली ः चामोर्शी तालुक्‍यातील सोमनपल्ली येथील एका किराणा दुकानातून स्वस्त धान्य दुकानातील तांदुळासह एचटीबिटी बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त बियाण्याची किंमत २९ हजार २२५ रुपये असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आष्टी परिसरात कापूस लागवड क्षेत्र आहे. त्यामुळे कापसाचे बियाणे दरवर्षी लागते. ही संधी साधत अनधिकृत बियाणे पुरवठादारही सक्रिय झाले आहेत. एका दुकानातूनच अवैध बीटी बियाणे विक्रीची माहिती तालुका कृषी अधिकारी डांगे यांना मिळाली. त्यांनी माहितीच्या आधारे पोलिसांसह जात अशोक तुकाराम पेद्दीवार (वय ३२) यांच्या किराणा दुकानाची झडती घेतली.

यावेळी दुकानातून रामा जातीचे १२ पाकिटे (किंमत ९००० रुपये), विजया जातीचे ११ पाकिटे (८२२५ रुपये), मेघना-४५ जातीच्या कापूस बियाण्याचे सहा पाकिटे (४५०० रुपये), राघवा जातीच्या बियाण्याचे दहा पाकिटे (७५०० रुपये) असे एकूण २९ हजार २२५ रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी पेद्दीवार यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

धान्य साठाही जप्त दुकानालगतच्या खोलीत ३३ तांदळाच्या पोत्याची तहसीलदारांनी चौकशी केली. त्या तांदळाच्या पोत्यावर स्वस्त धान्य दुकानाचा शिक्‍का होता. तो माल शासकीय असल्याचे स्पष्ट झाल्याने तो देखील जप्त करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com