वैनगंगा नदी काठावर एचटीबिटी पाकिटांचा साठा जप्त

चंद्रपूर ः अवैध तस्करांकडून एचटीबिटीचा ६० हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडून ६७ पाकिटे जप्त केली.
Stocks of HTBT packets seized on the banks of Wainganga river
Stocks of HTBT packets seized on the banks of Wainganga river

चंद्रपूर ः अवैध तस्करांकडून एचटीबिटीचा ६० हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडून ६७ पाकिटे जप्त केली.

रामदास हिंगणे (वय ३८), दिलीप हिंगणे (वय ३२), सुमित काळे (रा. अनखोडा, गडचिरोली) अशी आरोपींची नावे आहेत. तारसा (बुज.) येथील रामदास व दिलीप हिंगणे हे दुचाकीने (एमएच ३४ बीपी - ६५१२) एचटीबिटी बियाण्यांचे पाकिटे घेऊन गोंडपिंपरीकडे येत होते. वैनगंगा नदी काठावरील तपासणी नाक्‍यावर पोलिसांनी त्यांना अडवून झडती घेतली. त्यांच्याकडे असलेल्या बियाण्यांबाबत खात्री पटविण्यासाठी गोंडपिंपरी तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांना बोलावण्यात आले.

यावेळी प्राथमिक तपासात हे एचटीबिटी बियाणे असल्याचे समोर आल्याने दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याडून ६० हजार रुपये किंमतीची ७४ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी हे बियाणे गडचिरोली जिल्ह्यातील सुमित काळे यांच्याकडून आणल्याचे सांगितले. त्या माहितीवरुन पोलिसांनी सुमित काळे यालाही ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com