Agriculture news in marathi; Stocks in projects in Khandesh are up to78% | Agrowon

खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍यांपर्यंत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील प्रकल्पांमध्ये जलसाठा आहे. एकूण जलसाठा ७८ टक्‍क्‍यांवर आहे. अनेक प्रकल्प १२ ते १३ वर्षांनंतर १०० टक्के भरले असून, यामुळे आवर्षणप्रवण भागात रब्बी पिकांबाबत आशादायी वातावरण आहे. 

जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील प्रकल्पांमध्ये जलसाठा आहे. एकूण जलसाठा ७८ टक्‍क्‍यांवर आहे. अनेक प्रकल्प १२ ते १३ वर्षांनंतर १०० टक्के भरले असून, यामुळे आवर्षणप्रवण भागात रब्बी पिकांबाबत आशादायी वातावरण आहे. 

खरिपात अतिपावसामुळे पिकांची हानी झाली आहे. ज्वारी, कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका आदी पिकांचे नुकसान झाले. कोरडवाहू कापसाची स्थिती बरी आहे. रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा हा भाग अवर्षणप्रवण मानला जातो. या भागाला गिरणा धरण १०० टक्के भरल्याने रब्बीसाठी सिंचनासंबंधी पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर भुसावळ, जामनेर, जळगावमधील अनेक गावांच्या शिवारात वाघूर प्रकल्पदेखील १०० टक्के भरल्याने पाणी मिळणार आहे. धुळ्यातील पांझरा व शिरपूरमधील अनेर प्रकल्पदेखील १०० टक्के भरले असून, त्यातून रब्बीसाठी आवर्तन मिळण्याची शाश्‍वती आहे. परंतु, प्रशासन व कालवा समित्यांनी अद्याप रब्बीसंबंधी पाणी आरक्षणाबाबत निर्णय घेतलेला नाही. यामुळे या पाण्यासंबंधी प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी पाणी मिळेल, या अपेक्षेने रब्बीचे नियोजन केले आहे. 

खानदेशात नंदुरबारमधील रंगावली, दरा, शिवन, सुसरी, तापी नदीवरील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज हे प्रकल्प १०० टक्के भरले. धुळ्यातील पांझरा, जामखेडी, तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज, मालनगाव, बुराई, अनेर आदी सात प्रकल्प १०० टक्के भरले आहे. अनेर व पांझरा प्रकल्पातून नदीत विसर्ग सुरू आहे. तो काही दिवसांत बंद होईल. जळगाव जिल्ह्यात तोंडापूर, पश्‍चिम भागातील हिवरा, बहुळा, अंजनी, बोरी, गिरणा, तोंडापूर, वाघूर हे प्रकल्प तर सातपुडा पर्वत व मध्य भागातील हतनूर, मंगरूळ, अभोरा, सुकी, मोर हे प्रकल्पदेखील १०० टक्के भरले. चोपडा तालुक्‍यातील गूळ प्रकल्पातही ८५ टक्‍क्‍यांवर साठा आहे. सध्या गिरणा, हतनूर, वाघूर आदी मोठ्या प्रकल्पांमधून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळाली. 
 


इतर ताज्या घडामोडी
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...