दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्क्यांपर्यंत
जळगाव ः खानदेशात सर्वच भागांतील प्रकल्पांमध्ये जलसाठा आहे. एकूण जलसाठा ७८ टक्क्यांवर आहे. अनेक प्रकल्प १२ ते १३ वर्षांनंतर १०० टक्के भरले असून, यामुळे आवर्षणप्रवण भागात रब्बी पिकांबाबत आशादायी वातावरण आहे.
जळगाव ः खानदेशात सर्वच भागांतील प्रकल्पांमध्ये जलसाठा आहे. एकूण जलसाठा ७८ टक्क्यांवर आहे. अनेक प्रकल्प १२ ते १३ वर्षांनंतर १०० टक्के भरले असून, यामुळे आवर्षणप्रवण भागात रब्बी पिकांबाबत आशादायी वातावरण आहे.
खरिपात अतिपावसामुळे पिकांची हानी झाली आहे. ज्वारी, कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका आदी पिकांचे नुकसान झाले. कोरडवाहू कापसाची स्थिती बरी आहे. रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा हा भाग अवर्षणप्रवण मानला जातो. या भागाला गिरणा धरण १०० टक्के भरल्याने रब्बीसाठी सिंचनासंबंधी पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर भुसावळ, जामनेर, जळगावमधील अनेक गावांच्या शिवारात वाघूर प्रकल्पदेखील १०० टक्के भरल्याने पाणी मिळणार आहे. धुळ्यातील पांझरा व शिरपूरमधील अनेर प्रकल्पदेखील १०० टक्के भरले असून, त्यातून रब्बीसाठी आवर्तन मिळण्याची शाश्वती आहे. परंतु, प्रशासन व कालवा समित्यांनी अद्याप रब्बीसंबंधी पाणी आरक्षणाबाबत निर्णय घेतलेला नाही. यामुळे या पाण्यासंबंधी प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी पाणी मिळेल, या अपेक्षेने रब्बीचे नियोजन केले आहे.
खानदेशात नंदुरबारमधील रंगावली, दरा, शिवन, सुसरी, तापी नदीवरील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज हे प्रकल्प १०० टक्के भरले. धुळ्यातील पांझरा, जामखेडी, तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज, मालनगाव, बुराई, अनेर आदी सात प्रकल्प १०० टक्के भरले आहे. अनेर व पांझरा प्रकल्पातून नदीत विसर्ग सुरू आहे. तो काही दिवसांत बंद होईल. जळगाव जिल्ह्यात तोंडापूर, पश्चिम भागातील हिवरा, बहुळा, अंजनी, बोरी, गिरणा, तोंडापूर, वाघूर हे प्रकल्प तर सातपुडा पर्वत व मध्य भागातील हतनूर, मंगरूळ, अभोरा, सुकी, मोर हे प्रकल्पदेखील १०० टक्के भरले. चोपडा तालुक्यातील गूळ प्रकल्पातही ८५ टक्क्यांवर साठा आहे. सध्या गिरणा, हतनूर, वाघूर आदी मोठ्या प्रकल्पांमधून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळाली.