यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्त

परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाने एक कृषी सेवा केंद्र सील करण्याची कारवाई केली आहे. अडीच लाख रुपयांचा अनधिकृत मिश्र खतांचा साठा देखील या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्त Stocks of unauthorized fertilizers seized in Yavatmal
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्त Stocks of unauthorized fertilizers seized in Yavatmal

यवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाने एक कृषी सेवा केंद्र सील करण्याची कारवाई केली आहे. अडीच लाख रुपयांचा अनधिकृत मिश्र खतांचा साठा देखील या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.  खरिपाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात अनधिकृत बियाणे व खताचा शिरकाव झाला आहे. बियाणे व खत माफिया जिल्ह्यात सक्रिय झाले असतानाच पोलिस व कृषी विभागाने देखील त्यांच्या विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. कृषी विभागाला पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथे अनधिकृत खताचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे कृषी विभागाने सेवादास कृषी केंद्रावर छापेमारी केली.  या वेळी कृषी सेवा केंद्रातून किसान गोल्ड कंपनीच्या मिश्र खताचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित कृषी सेवा केंद्राच्या परवान्यात या खताची नोंद नाही. त्यानंतर देखील खताचा साठा करण्यात आल्याने कृषी विभागाने कारवाई केली. या कारवाईत किसान गोल्ड कंपनीचे लेबल असलेले २०:२०:०० खताचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई राजेंद्र माळोदे, पंकज बर्डे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दत्तात्रय आवारे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नायक यांच्या पथकाने केली. 

बीटीनंतर खत जप्त कृषी विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी ६५ लाख रुपयांचे अनधिकृत बियाणे जप्त केले होते. या पूर्वी देखील अनधिकृत बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर आता अनधिकृत खत जप्त करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com