Agriculture news in marathi Stomach ache in Uttar Pradesh over sugar transport subsidy to Maharashtra | Page 2 ||| Agrowon

महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान देण्यावरून उत्तरप्रदेशला पोटशूळ 

राजकुमार चौगुले
मंगळवार, 20 एप्रिल 2021

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्याने याचा पोटशूळ उत्तरप्रदेशला उठला आहे. हे अनुदान देण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी उत्तरप्रदेश साखर कारखाना संघाने केंद्राकडे केली आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्याने याचा पोटशूळ उत्तरप्रदेशला उठला आहे. हे अनुदान देण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी उत्तरप्रदेश साखर कारखाना संघाने केंद्राकडे केली आहे. असे अनुदान मिळाल्यास उत्तरप्रदेशचे नुकसान होऊन महाराष्ट्राला फायदा होईल, असे सांगत संघाने नाराजी व्यक्त केली आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाला संघाने या बाबतचे पत्र दिले आहे. 

यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होत आहे. देशांतर्गत साखर विक्रीमध्ये उत्तरप्रदेश व महाराष्ट्रात स्पर्धा असते. ईशान्य व उत्तरेकडील राज्यांना उत्तरप्रदेशातील साखर वाहतूकीच्या दृष्टीने स्वस्त पडत असल्याने तेथील साखरेला या राज्यांकडून मागणी वाढत आहे. एमएसपीच्या नियमाअगोदर साखर कोणत्या दरात विकायची याबाबत बंधन नव्हते. यामुळे दर कमी जास्त करुन महाराष्ट्रातील साखर कारखाने पूर्वेकडील राज्यांना साखर विक्री करत होते. परंतू एमएसपी जाहीर केल्यानंतर मात्र सगळीकडे एकसमान दराची अंमलबजावणी झाली. 

दर स्थिर असल्याने व अंतर जास्त असल्याने उत्तरेकडील राज्यांना महाराष्ट्राची साखर क्विंटलला शंभर ते दीडशे रुपयापर्यंत महाग पडू लागल्याने महाराष्ट्रातील साखरेला मागणी कमी राहिली. यामुळे महाराष्ट्र शासनाने वाहतूक अनुदान द्यावे, अशी मागणी राज्यातील कारखान्यांकडून होत आहे. साखर आयुक्तालयाने ही याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. हे अनुदान मिळाल्यास उत्तरप्रदेशच्या साखरेला दणका बसेल, असे गृहीत धरुन उत्तर प्रदेशातील साखर कारखानदारांनी या अनुदानाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. 

उत्तर प्रदेशातील कारखानदार म्हणतात 

  • असे अनुदान दिल्यास ते एकतर्फी होईल 
  • याचा फटका महाराष्ट्र वगळता इतर राज्यांना बसेल 
  • उत्तर व ईशान्येकडील राज्ये उत्तरप्रदेशच्या साखरेची बाजारपेठ आहेत 
  • या राज्यांना साखर विक्री करणे परवडत नसेल तर महाराष्ट्राचा या राज्यातच विक्रीसाठी अट्टहास का? 
  • मुक्त बाजारपेठ असताना असे एखाद्या राज्याला संरक्षण देणे अन्यायी 
  • महाराष्ट्राने त्यांच्या जवळच्या राज्यांच्या बाजारपेठा शोधाव्यात 
  • अनुदान द्यायचे असेल तर सर्वच राज्यांनी आपल्या भागातील कारखान्यांना अनुदान द्यावे 

उत्तरप्रदेशातील कारखान्यांची ही मागणी हास्यास्पद म्हणावी लागेल. त्यांनी पत्र दिले असले तरी त्यांची मागणी मान्य होण्याची शक्यता कमी आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्राची बाजारपेठ बळकावली आहे. यामुळे राज्यातील साखर साठे पडून राहत आहेत. त्याची जलद विक्री व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन अनुदान देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हे स्वागतार्ह आहे. उत्तरप्रदेशच्या कारखान्यांनी याबाबत तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली जाईल, असे वाटत नाही 
- प्रकाश नाईकनवरे, 
व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ  
 


इतर अॅग्रोमनी
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक...
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...