ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक 

​ सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळेच संतप्त कार्यकर्त्यांनी आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्याला जाणारी उसाची वाहने सोमवारी (ता. २५) रात्री फोडली.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक  Stone throwing on vehicles transporting sugarcane
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक  Stone throwing on vehicles transporting sugarcane

सांगली : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळेच संतप्त कार्यकर्त्यांनी आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्याला जाणारी उसाची वाहने सोमवारी (ता. २५) रात्री फोडली. सांगली तासगाव रस्त्यावर कुमठे फाटा येथे ही घडली. त्यात दोन ट्रॅक्टर आणि एक ट्रकची तोडफोड करून हवा सोडण्यात आली आहे. आरग येथील कारखान्याने गतवर्षी एकरकमी एफआरपी दिली होती. मात्र यंदा त्यांनी अद्याप एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळे कवठेएकंद येथून आरगकडे जाणारी वाहने अडवून त्यांची हवा सोडली. वाहनावर दगडफेक केली. सोमवारी दुपारी भिलवडी परिसरात ‘स्वाभिमानी’कडून उसाची वाहने अडवली होती.  कोल्हापूर जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शिरगुप्पीसह काही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. जे एकरकमी एफआरपी जाहीर करतील ते कारखाने सुरू राहतील, मात्र जे दर जाहीर करणार नाहीत, ते कारखाने बंद पाडू, तोडी बंद पाडू, असा इशारा संघटनेने दिला होता. ऊसतोडी सुरू झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होत आहेत.  जयसिंगपूर येथे ऊस परिषद नुकतीच झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी आणि वाढीव साखरेचा दर गृहीत धरून ३०० रुपये जानेवारीत द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसाच ठराव परिषदेत झाला आहे. यानुसार कोल्हापुरातील दहा कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. त्यांच्या ऊसतोडी सुरूचा निर्णय झाला, मात्र त्यांनी वाढीव ३०० रुपये जानेवारी महिन्यात द्यावेत अन्यथा ते कारखाने जानेवारीत बंद पाडले जातील. मात्र एफआरपी जाहीर न केलेल्या कारखान्यांच्या तोंडी बंद पाडल्या जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com