औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू; ग्रामस्थांनी घेतली शपथ

जमिनीवर होणारे अत्याचार थांबवून, कोणत्याही प्रकारे नांगरणी, कुळवणी आणि कोळपणीची कामे करणार नाही. आमच्या पिकांची चांगली देखभाल करून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवू ही आमची या गावाप्रती शपथ आहे, जी आम्ही पाळू.
Stop atrocities on the ground; The villagers took the oath
Stop atrocities on the ground; The villagers took the oath

औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे अत्याचार थांबवून, कोणत्याही प्रकारे नांगरणी, कुळवणी आणि कोळपणीची कामे करणार नाही. आमच्या पिकांची चांगली देखभाल करून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवू ही आमची या गावाप्रती शपथ आहे, जी आम्ही पाळू.

मथळा अन्‌ बातमीचा सार वाचून आश्चर्य वाटले असेल. पण हो अशी शपथ घेतली आहे ती, नानाजी देशमुख कृषी प्रकल्पांतर्गत (पोकरा) असलेल्या कन्नड तालुक्‍यातील माळेगाव (ठोकळ) येथील शेतकऱ्यांनी. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना विविध तंत्रे शिकविण्यात येत आहेत. त्यापैकीच शून्य मशागतीचे एसआरटी तंत्र वापरण्यासाठी नुकतेच प्रकल्प गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानही जाहीर केले आहे. 

या तंत्राचा मराठवाड्यात खासकरून औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जातो आहे. भातासाठीचे हे तंत्र इतर पिकात वापरणारा औरंगाबाद हा राज्यात व देशात एकमेव जिल्हा असावा. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील माळेगाव (ठोकळ) या डोंगरमाथ्यावरील दुर्गम गावाने कापूस, मका, सोयाबीन सारखी पिकं एसआरटी तंत्रज्ञानाने घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रकल्पाचे मुंबई कार्यालयातील कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी सोमवारी (ता. ६) या शेतीची पाहणी केली. 

या प्रक्षेत्र भेटीमध्ये मुंबई कार्यालयाचे संनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ सचिन कदम, उपविभागीय कृषी अधिकारी प्रबुद्ध चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, प्रकल्प विशेषज्ञ विशाल आगलावे सहभागी झाले होते.गावाने एकत्र येऊन एसआरटी पद्धतीने केलेले बेड मोडणाऱ्या आणि औताने मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला, असे उपसरपंच प्रभाकर ठोकळ यांनी सांगितले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या माळेगाव (ठोकळ) पुन्हा निसर्गाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. निसर्गाचे महत्त्व गावकऱ्यांना कळले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शेतीमध्ये मोठा बदल घडून येऊ शकतो. - विजय कोळेकर, कृषी विद्यावेत्ता, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) मुंबई  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com