माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीमधील अनागोंदी थांबवा

माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीमधील अनागोंदी थांबवा
माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीमधील अनागोंदी थांबवा

पुणे ः माथाडी कायद्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीमधील अनागोंदी व मनमानी तात्काळ थांबवावी, तसेच पणन व माथाडी कायद्यातून तोलणारांना वगळण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी. या आणि विविध मागण्यांसाठी राज्य हमाल मापाडी महामंडळासह विविध संघटनांनी मंगळवारी (ता. ४) पुणे बाजार समिती बंद ठेवली होती. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले. 

माथाडी कायद्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माथाडी आणि कष्टकरी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती बंद ठेवत, मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी विविध कामगार संघटनांनी मोर्चात सहभाग घेतला होता.

या वेळी डॉ. आढाव म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील माथाडी कायद्याचा आदर्श देशभरात राबविण्यासाठी विविध राज्ये विचार करत आहेत. मात्र, सध्याचे सरकार कायदा मोडीत काढण्याचे षडयंत्र करीत असून, यामुळे कामगार उद्ध्वस्त होणार आहेत. माथाडी कायदा यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून, या निमित्ताने आम्ही विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांची सरकारने दखल घेत तातडीने अंमलबजावणी करावी.’’ 

या वेळी डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com