Agriculture news in Marathi Stop cheating farmers in Bt cotton seeds | Agrowon

बीटी कापूस बियाण्यातील शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

दरवर्षी येणारी बोंडअळी, इतर कीड पाहता शेतकऱ्यांची या बियाण्याच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. हा प्रकार थांबविला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष विश्‍वनाथ झाडोकार यांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे केली.

बुलडाणा ः कापूस उत्पादकांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळेल या हेतूने बीटी बियाण्याचे समर्थन करण्यात आले. मात्र, दरवर्षी येणारी बोंडअळी, इतर कीड पाहता शेतकऱ्यांची या बियाण्याच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. हा प्रकार थांबविला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष विश्‍वनाथ झाडोकार यांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे केली.

याबाबत श्री. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, अमरावती महसूल विभागात प्रमुख नगदी पीक म्हणून कापूस पेरणी सर्वात जास्त होते. स्वातंत्र्यपूर्वीपासून कापूस उत्पादन घेतले जाते. पूर्वी देशी वाणाचे उत्पादन साधारण मेहनत व माफक खर्चामध्ये एकरी सात ते आठ क्लिंटल उत्पादन होत होते. त्या काळात या परिसरातील कापसाची महाराष्ट्र सरकारने खरेदी केली. शेतकरी सुद्धा मिळणाऱ्या हमी भावात समाधानी होतें शेतकरी आत्महत्या या शब्दाची ओळख सुद्धा नव्हती. कालांतराने सुधारित तंत्रज्ञान, शेतकरीहित, अधिक उत्पादकता, कमी खर्च या तांत्रिक निकषावर शासनाने बीटी कापूस वाणाला मान्यता दिली.

सुरुवातीला काही वर्षात दर्जेदार बियाणे मिळाले. अधिक उत्पादन सुद्धा झाले. त्या काळात कपाशीवर येणारे रोग नियंत्रणात राहत. फवारणी खर्च कमी होता. बोंडअळीचा प्रादुर्भाव नव्हता. परंतु काही काळापासून बीटी बियाणे उत्पादक कंपन्या १०० टक्के व्यावसायिक झाल्या. शेतकरी हित व गुणवत्ता या बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यादृष्टीने असंख्य बियाणे उत्पादक कंपन्या बाजारात आल्या. भुलभुलैय्या जाहिरातीतून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याची स्पर्धा सुरू झाली. शासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण यावर दिसले नाही.

आज सुद्धा बियाण्यांचा दर्जा पीक आल्यानंतर शेतकऱ्यांना समजतो. बियाण्यांच्या बॅगवर शासनाचे टॅग प्रमाणपत्र दिसत नाही. अधिक उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी सर्वाधिक प्रयत्न करतो. रासायनिक खते देतो. परंतु या बीटी कपाशीवर किडीचे प्रमाण वाढले आहे. निकृष्ट दर्जाचे कीटकनाशके बाजारात अवाजवी भावाने विक्री केली जातात. कीटकनाशक कंपन्यांमध्येही स्पर्धा सुरू झाली. बियाणे उत्पादक कंपन्या, कीटकनाशक कंपन्या व विक्रेते शेतकऱ्यांची फसवणूक करून शेतकरी लुबाडले जात आहे. हे चक्र तोडून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी झाडोकार यांनी केली आहे.


इतर बातम्या
पुणे जिल्ह्यात अवकाळीचा १०८ हेक्टरवरील...पुणे : पुणे जिल्ह्यात १८ आणि १९ फेब्रुवारीला खेड...
खानदेशात कांदा काढणी लवकरच सुरू होणार जळगाव : खानदेशात कांद्याची लागवड सुमारे १८ हजार...
कोरोनामुळे अंतिम टप्प्यातील ऊस हंगाम...कोल्हापूर : राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात...
सातबारा, आठ ‘अ’च्या अधिकारासह पंतप्रधान...नाशिक : केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध...
क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी सातारा...सातारा : जिल्ह्यातील नदीकाठी क्षारपड जमिनी...
बेदाणा निर्यात अनुदान बंदचा उत्पादकांना...सांगली ः गतवर्षी देशातून बेदाण्याची सुमारे ३०...
कृषी सहायकांची बैठक व्यवस्था योजना...नागपूर ः गावपातळीवर ग्रामविस्ताराला चालना मिळावी...
डिझेल दरवाढीने पीक काढणीचे दर वाढलेअकोलाः गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर सातत्याने...
‘माफसू’तील प्राध्यापकांना सातवा वेतन...नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान...
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी ...मुंबई : ‘‘मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम...
शेतमाल बाजारपेठेसाठी सरकारचे विशेष...मुंबई : ‘विकेल ते पिकेल’ या अभियानामध्ये पीक,...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या...सोलापूर ः पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव...
महावितरणचे राज्यात आता 'कृषी ऊर्जा...सोलापूर ः राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-...
...त्यानंतर वैधानिक मंडळे घोषित करू : ...मुंबई : ‘‘ज्या दिवशी राज्यपाल नियुक्त बारा...
मानोलीत रब्‍बी ज्‍वारीची पीक प्रात्‍...परभणी ः ‘‘आहारात ज्‍वारीच्‍या भाकरीस पोषणाच्‍या...
शेळ्या-मेंढ्यांना आधुनिक औषधोपचाराची...अकोला ः भारतातील बहुसंख्य अल्पभूधारक व भूमिहीन...
रानवाडी प्रकल्पाचा वनवास केव्हा संपणार?जलालखेडा, जि. नागपूर : नरखेड तालुक्यामधील पंचायत...
उन्हाळ्यासाठी चारवेळा मिळणार ‘इसापूर’चे...नांदेड : जिल्ह्याला वरदान ठरलेला ऊर्ध्व पैनगंगा...
भातगाव येथे आंबा, काजूची बाग होरपळलीगुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील भातगाव येथे...
गारपीटीने कांदा पातींसह स्वप्नेही तुटली...नाशिक : अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामात अनेक कारणांनी...