Agriculture news in marathi Stop cheating by grape growers, traders, laborers | Agrowon

द्राक्ष उत्पादकांची व्यापारी, मजूरांकडून होणारी फसवणूक थांबवा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

नाशिक :व्यापारी शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करून इतर राज्यात पाठवतात. परंतु, पैसे न देता पळून जातात. शेतकऱ्याची फसवणूक करतात. ही फसवणूक थांबवा.

नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे परप्रांतीय आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे व्यापारी शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करून इतर राज्यात पाठवतात. परंतु, पैसे न देता पळून जातात. शेतकऱ्याची फसवणूक करतात. ही फसवणूक थांबवा, अशी मागणी नाशिक शेतकरी संघटना व शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे केली. 

कर्ज काढून द्राक्ष उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. बऱ्याच शेतकऱ्यांना मालमत्ता विकावी लागली आहे. व्यापारी जिल्ह्यातून माल विकत घेऊन पैसे न देता फसवणूक करून निघून जातात. त्यांच्यावर शासनाचा कोणत्याही प्रकारचा निर्बंध नसतो. हे सर्व टाळण्यासाठी शासनाकडून पणन महामंडळाकडून उपाययोजना आवश्‍यक आहेत, असे दिघावकर यांनी सांगितले.

शासकीय यंत्रणेकडे या व्यापाऱ्यांची नोंदणी करून शेतमाल खरेदीपूर्वी व्यापाऱ्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे अकाउंट, रेशन कार्ड, असे पुरावे घ्यावे. त्यांच्याकडून योग्य रकमेचे डिपॉझिट व नोंदणी शुल्क घ्यावे. द्राक्ष व इतर फळपिके विकत घेण्याचा परवाना शासनाने द्यावा. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.  

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे टोळ्या कामासाठी येतात. टोळ्या हंगाम सुरू होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांकडून पैशांची उचल घेतात. नंतर कामावर येत नाहीत. अशाही पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. शेतकरी पोलिस ठाण्यात  तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर अशा टोळ्या प्रमुखांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले, द्राक्ष विज्ञान मंडळाचे अध्यक्ष वसंत ढिकले, उपाध्यक्ष चंद्रकांत बनकर, उत्तर महाराष्ट्र  शेतकरी संघर्ष संघटनेचे प्रमुख नाना बच्छाव, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघाचे नितीन रोटे पाटील, मनोज भारती, राहुल बिऱ्हाडे यासह शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...