Agriculture news in marathi Stop the collection of compulsory electricity bill immediately, road-block in Solapur district | Agrowon

सक्तीची वीजबिल वसुली त्वरित थांबवा, सोलापूर जिल्ह्यात रास्ता-रोको

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 मार्च 2021

वीजबिलासाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करणे, ट्रान्स्फार्मर बंद करणे, संपूर्ण गावात एकच तास वीज देणे, हे सर्व प्रकार त्वरित थांबवा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल

सोलापूर : वीजबिलासाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करणे, ट्रान्स्फार्मर बंद करणे, संपूर्ण गावात एकच तास वीज देणे, हे सर्व प्रकार त्वरित थांबवा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता. १९) जिल्ह्यातील प्रमुख नऊ महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन करत लक्ष वेधले. 

जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, युवा अध्यक्ष विजय रणदिवे, सरचिटणीस उमाशंकर पाटील, पप्पू पाटील, तानाजी बागल यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलने जिल्ह्यात झाली. शेतकऱ्यांना राज्य सरकारने कृषी संजीवनी योजना आणून वीज बिलात ३३ टक्के सवलत व बिले भरण्यासाठी मार्च २०२२ पर्यंतची मुदत दिलेली आहे. तरीही महावितरणकडून शेतीपंपांची व घरगुती वीज तोडणी सुरू आहे.लॉकडाउनच्या काळात सर्वाचे व्यवसाय उद्योग रोजगार बंद होते.

लॅाकडाउननंतर महावितरणकडून अव्वाच्या सव्वा दराने घरगुती वीजबिल आल्यामुळेच सर्व सामान्यांना वीजबिल भरणे शक्य नव्हते. त्यामुळे किमान तीन महिन्यांचे घरगुती वीजबिल माफ करावे, तसेच शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्याची मोहीम त्वरित थांबवा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष पटेल यांनी केली. 

प्रमुख मागण्या 
शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करा 
लॅाकडाउन काळातील घरगुती वीजबिल माफ करा 
थकीत एफआरपी त्वरित जमा करा 

या ठिकाणी झाली आंदोलने 

  • बार्शी-सोलापुर रोडवर शिवाजी चौक, वैराग 
  • माढा-वैराग रोडवर शिवाजी चौक, माढा 
  • मोहोळ-कुरुल रोडवर, एमएसईबी समोर मोहोळ 
  • पंढरपूर-कराड रोडवर- उपरी 
  • पंढरपूर-पुणे रोडवर खडूस 
  • टेंभुर्णी-नगर रोडवर कुंभेज फाटा 
  • मोहोळ-विजापूर रोडवर मंद्रूप 
  • सोलापूर रोडवर डोणगाव 
  • अक्कलकोट-सोलापुर रोडवर एमएसईबीसमोर अक्कलकोट 

इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...