agriculture news in Marathi, stop dr, mayi from president post, Maharashtra | Agrowon

डॉ. मायींना विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ अध्यक्षपदापासून रोखले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

पुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठे भरती मंडळाच्या अध्यक्षपदापासून डॉ. सी. डी. मायी यांच्यासारख्या कृषी शास्त्रज्ञाला पद्धतशीरपणे रोखण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘‘मलादेखील हे पद नकोय. पण मला माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगून काही जणांनी ही खेळी केली असू शकते,’’ असे मत डॉ. मायी यांनी व्यक्त केले. 

पुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठे भरती मंडळाच्या अध्यक्षपदापासून डॉ. सी. डी. मायी यांच्यासारख्या कृषी शास्त्रज्ञाला पद्धतशीरपणे रोखण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘‘मलादेखील हे पद नकोय. पण मला माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगून काही जणांनी ही खेळी केली असू शकते,’’ असे मत डॉ. मायी यांनी व्यक्त केले. 

डॉ. मायी हे माजी कुलगुरू आहेतच, पण देशाच्या कृषी क्षेत्रातील सर्वात मोठी पदे भूषविलेले सध्याचे एकमेव मराठी शास्त्रज्ञ आहेत. देशाच्या शास्त्रज्ञ भरती मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी चार वर्ष भूषविले असून, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक आणि देशाचे कृषी आयुक्त म्हणून देखील कामकाज पाहिले आहे. शिस्तप्रिय काम आणि पारदर्शकपणा असलेल्या डॉ. मायी यांच्याकडे राज्यातील कृषी विद्यापीठे भरती मंडळाचे अध्यक्षपद देण्याचा प्रयत्न तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडून झाला होता. तथापि, एका लॉबीने त्यात कोलदांडा घातला आणि त्यांची नियुक्ती रखडल्याचे सांगितले जाते. 

‘‘मी स्वतः चार सर्वोच्च पदावर काम केले आहे. मी स्वतः देशपातळीवर कृषी शास्त्रज्ञ भरतीसाठी असलेल्या सर्वोच्च संस्थेत पाच हजार शास्त्रज्ञांची भरती केली. राज्यातील या पदाबाबत मला विचारणा झाली होती. मात्र, मी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगून बाजूला सारले जाण्याची शक्यता आहे. अर्थात आता मी देखील या पदासाठी इच्छुक नाही,’’ असे डॉ. मायी यांनी स्पष्ट केले. 

डॉ. मायी यांचे वय सध्या ७२ वर्षे आहे. हीच माहिती मिळवून मंडळाच्या अध्यक्षपदासाठी वयाची अट कमी टाकली गेली आहे. मंडळ अध्यक्षपदासाठी ७० वर्षे वयोमर्यादा नमूद करण्यात आल्याने एक प्रकारे डॉ. मायी यांना पदापासून लांब ठेण्याचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, कृषी विद्यापीठे भरती मंडळाच्या नव्या अध्यक्षाचा शोध घेण्याचे काम अखेर राज्य शासनाने सुरू केल्याने विद्यापीठांच्या आशा उंचावल्या आहेत. माजी कुलगुरू दर्जाच्या व्यक्तीकडे मंडळाचे अध्यक्षपद दिले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘‘डॉ. खर्चे यांच्यानंतर एका शास्त्रज्ञाला मंडळाचे अध्यक्षपद देण्याचा प्रयत्न झाला होता. तथापि, या शास्त्रज्ञाचे निधन झाल्यामुळे मंडळ दिशाहिनच राहिले. आता परिषदेचे नवे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी मंडळाच्या नव्या अध्यक्षांसाठी पाठपुरावा सुरू केल्याने लवकरच नवा अध्यक्ष मिळणे अपेक्षित आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

विशिष्ट व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवूनच शोध
मंडळाच्या अध्यक्षपदासाठी राज्यात किंवा राज्याच्या बाहेर सेवाकाल पूर्ण केलेला कोणताही कुलगुरू किंवा भारतीय कृषी संशोधन परिषदेचा माजी महासंचालक अशी पात्रता ठेवण्यात आली आहे. १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. ‘‘मंडळ अध्यक्षाचे निकष देताना विशिष्ट व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून शोध सुरू असल्याचा संशय मला आहे. मी या पदासाठी अजिबात इच्छुक नाही. मात्र, चुकीच्या व्यक्तीची निवड झाल्यास सत्याचा आग्रह धरणारे इतर शास्त्रज्ञ गप्प बसतील असे वाटत नाही,’’ असेही डॉ. मायी यांनी म्हटले आहे.


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...