अर्ली द्राक्षाच्या हंगामाची सांगता

यंदा पाऊस कमी असतानाही द्राक्ष निर्यातक्षम होण्यासाठी सिंचन, खतांचे योग्य व्यवस्थापन केले. चांगले उत्पादन घेतले. त्याला चांगला बाजारभाव मिळाला. यामुळे समाधानी आहे. - कृषिभूषण शेवाळे, द्राक्ष उत्पादक, भुयाने, ता. बागलाण सध्या तापमानात वाढ होत आहे. पुढील हंगामात माल तयार होण्यासाठी स्लरीचा वापर करणार आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. तापमानापासून संरक्षण करण्यासाठी बागांवरून कापडाचे आच्छादन करावे लावेल. - नीलेश पवार, युवा द्राक्ष उत्पादक, सातमाने, ता. मालेगाव खरड छाटणीनंतर सिंचनाचे व्यवस्थापन करावे लागेल. यासाठी कामाचे वेळापत्रक ठरविणार आहे. या वर्षीही अधिकाधिक द्राक्ष निर्यातीसाठी कसे जातील, यासाठी प्रयत्नशील आहे. - प्रदीप देवरे, द्राक्ष उत्पादक, वाजगाव, ता.देवळा
अर्ली द्राक्षाच्या हंगामाची सांगता
अर्ली द्राक्षाच्या हंगामाची सांगता

नाशिक : अर्ली द्राक्ष हंगामासाठी बागलाण भाग प्रसिद्ध आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस गोड्या छाटणीचे नियोजन करून द्राक्ष उत्पादक मेहनत घेत असतात. जूनपासून द्राक्षांची छाटणी करून द्राक्षबाग फुलविण्याचा प्रयोग या वर्षीही यशस्वी झाला. सुरुवातीस इतर द्राक्ष उत्पादन क्षेत्रातील माल काढणीस नसल्याने यंदा या भागातील द्राक्ष उत्पादकांच्या कष्टाचे चीज झाले. साधारणपणे सप्टेंबरमध्ये काढणीचा हंगाम सुरू होऊन तो आता संपला आहे. 

या भागात प्रामुख्याने तास-ई-गणेश, क्लोन २, थॉमसन, सोनाका या व्हाईट व्हरायटीचे वाण घेण्यात आले. यासह कलरमध्ये जंबो, रेड ग्लोब, क्रीमसन, शरद सीडलेस, नानासाहेब पर्पल या व्हरायटी घेण्यात आल्या. अर्ली द्राक्षाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागलाणमध्ये द्राक्ष हंगाम तेजीत राहिला. रशिया, दुबई, श्रीलंका या देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची निर्यात झाली. 

अडचणीतही उत्पादकांनी काटेकोर नियोजन करून उत्पादन घेतले. द्राक्षाला चांगला दर मिळाल्याने उत्पादकांमध्ये समाधान आहे. 

या भागातील द्राक्ष संपत असल्याने निफाड, दिंडोरी, चांदवड व नाशिक जिल्हातील द्राक्षाला मागणी वाढणार आहे. दरातही सुधारणा होईल. 

कमी पावसामुळे या भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली असल्याने सिंचनाचे व्यापस्थापन सुरू आहे. बागांना मल्चिंग करण्याचेही काम सुरू आहे. यासाठी कडबा कुट्टी, गवत, चिपडाचा वापर करण्यात येत आहे.  बागलाण भागातील किकवारी खुर्द आणि बुद्रुक, अमरावतीपाडा, पारनेर, डोंगरेज, मुंगसे, द्याने, बिलपुरी, श्रीपुरवडे, दसाणे, पिंगळवाडे, वाजगाव, कोडबेल, टेंभे, तळवाडे, गोराणे, बिजोटे, भुयाणे, लखमापूर यांसह मालेगाव तालुक्यातील सातमाने, जळगाव, गाळणे, दाभाडी, आघार, देवळा तालुक्यातील वाजगाव, खर्डा, लोहणेर, भावडे, कणकापूर भागात छाटण्या सुरू आहेत. 

मिळालेले दर 

द्राक्षाचा प्रकार कमाल किमान
कलर व्हरायटी १४० ८०
व्हाईट १२५ ६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com