agriculture news in Marathi stop exploitation of cotton producers Maharashtra | Agrowon

कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय जावंधिया

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

देशात कापसाचे दर कमी होत असतानाच त्यापासून तयार होणारे कापडाचे दर मात्र वाढते आहेत.

नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच त्यापासून तयार होणारे कापडाचे दर मात्र वाढते आहेत. ही दरी कमी करून कापूस उत्पादकांच्या हिताकडे लक्ष देत त्यांचे शोषण थांबविण्याची मागणी ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून कापूस उत्पादकांचे विविध स्तरावर होणाऱ्या शोषणाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. विजय जावंधिया यांच्या पत्रानुसार, हिमाचल प्रदेशातील सोलंग येथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मध्यस्थांची साखळी कमी होत शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट विकता यावा याकरिता तीन नवे विधेयक पारित केल्याचे सांगितले होते.

हिमाचलमध्ये उत्पादित सफरचंद ४० ते ५० रुपये किलोने शेतकऱ्यांकडून खरेदी करून दिल्लीच्या बाजारात शंभर ते दीडशे रुपये किलोने विकल्या जाते. यातील शंभर रुपयांचा कोणताच हिशोब शेतकऱ्यांना मिळत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील हाच धागा पकडत श्री. जावंधिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सफरचंद उत्पादकांप्रमाणेच कापूस उत्पादकांचे देखील मध्यस्थांच्या साखळीत शोषण होते. त्यामुळे त्यांची देखील यातून मुक्तता करावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. २०११- १२ मध्ये कापसाच्या भावात तेजी आली होती. ६०००० ते ६५००० रुपये प्रति खंडीपर्यंत रुईचे भाव पोचले होते. याची दखल घेत तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने कापसाची निर्यात बंद केली. यावेळी केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा आणि गुजरातमधून १० लाख कापूस गाठी निर्यात करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी केली होती.

रुईच्या प्रति खंडी दरात ६५ हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याने वस्त्रोद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांनी कापड दरातही त्यावेळी वाढ केली. ४० रुपयांच्या बनियानचे दर शंभर रुपये करण्यात आले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रति खंडी रुई दर ४० हजार रुपयांच्या आसपास आहेत. आज तर रुई खंडीचे दर ३६ ते ३९ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. अशावेळी कापडाचे दर कमी होणे अपेक्षित असताना वस्त्र उद्योग व्यावसायिकांना याचा सोईस्कर विसर पडला आहे.

कापूस उद्योग क्षेत्रात देखील या माध्यमातून नफेखोरी होत असल्याचे सिद्ध होते. मात्र, याचा कोणताही फायदा कापूस उत्पादकांना होत नाही. हे एक प्रकारचे शोषणच आहे. अशा वेळी नव्याने पारित करण्यात आलेल्या तीन विधेयकांचा उपयोग करीत कापूस उत्पादकांचे शोषण थांबविण्यासाठी आपल्या माध्यमातून पुढाकार घेण्यात यावा, अशी मागणी विजय जावंधिया यांनी केली आहे. 


इतर बातम्या
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...