Agriculture news in Marathi Stop extortion by supplying fertilizer in Baglan taluka | Page 2 ||| Agrowon

बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक थांबवा : राष्ट्रवादी काँग्रेस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

बागलाण तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना चढ्या दराने आणि अटी शर्ती लावत खतांची विक्री होत आहे. शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ आवश्यक खतांचा पुरवठा करावा : राष्ट्रवादी काँग्रेस

सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या महिनाभरापासून खत विक्रेत्यांकडून युरियासह इतर रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना चढ्या दराने आणि अटी शर्ती लावत खतांची विक्री होत आहे. शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ आवश्यक खतांचा पुरवठा करून त्यांची पिळवणूक थांबवावी आणि त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

तालुक्यात खतांच्या कृत्रिम टंचाईबाबत कृषी विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. चढ्या दरात किंवा विक्रेता देईल तिच रासायनिक खते शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. या संदर्भात माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

याबाबत तहसीलदार श्री. इंगळे-पाटील यांनी तत्काळ दूरध्वनीवरून तालुका कृषी अधिकारी सुधाकर पाटील यांच्याशी संपर्क साधून कोणत्याही परिस्थितीत खतांचा पुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना तहसीलदारांनी कृषी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस बागलाण अध्यक्ष अमोल बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, धिरज बागूल, अनिल चव्हाण, पप्पू वाघ, पांडुरंग सोनवणे, पंडितराव सोनवणे, रत्नाकर सोनवणे, जिभाऊ सोनवणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
अधिक आर्द्रतायुक्त वातावरणात द्राक्ष...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत पाऊस व पावसाळी...
जमीन सुपिकतेसाठी कंपोस्ट खत निर्मितीकंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी...
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...