Agriculture News in Marathi Stop farmers' debt collection for ten years | Agrowon

शेतकऱ्यांची कर्जवसुली दहा वर्षे थांबवा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

शेतकऱ्यांची कर्जवसुली दहा वर्षांपर्यंत थांबवावी. त्या काळातील व्याज सरकारने वित्तीय संस्थांना द्यावे. दहा वर्षांनंतर शेतकरी मुद्दलाची कर्जफेड करतील.

सांगली : शेतकऱ्यांची कर्जवसुली दहा वर्षांपर्यंत थांबवावी. त्या काळातील व्याज सरकारने वित्तीय संस्थांना द्यावे. दहा वर्षांनंतर शेतकरी मुद्दलाची कर्जफेड करतील. वीजबिल वसूल न करता ५० टक्के माफी द्यावी व उर्वरित ५० टक्के हप्त्याने वसूल करावेत, असा ठराव रविवारी (ता.१०) शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या परिषदेत करण्यात आला.

शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस, दूध, सोयाबीन, कर्ज व वीजबिलाबाबत टिळक स्मारक मंदिरात शेतकरी परिषद घेण्यात आली. सहकार आघाडीचे राज्य प्रमुख संजय कोले, सातारा जिल्हा प्रमुख बाळासो चव्हाण, सांगली जिल्हा प्रमुख नवनाथ पोळ तसेच राजेंद्र मोहिते, रामचंद्र कणसे, श्रीकांत शिंदे, शरद गद्रे, शीतल राजोबा आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कोले म्हणाले, ‘‘उसाला एफआरपीपेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे. एकरकमी उचल मागणे हा आंदोलनाचा विषय नव्हे. उसाला गुजरातप्रमाणे एफआरपीपेक्षा जास्त दर मिळावा. कर्जबाजारी राज्य सरकार व शेतकरी अशी अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांची कर्ज दहा वर्षे वसूल करण्याचे थांबवावे. त्या काळातील व्याज सरकारने वित्तीय संस्थांना द्यावे. दहा वर्षांनंतर शेतकरी मुद्दलाची कर्जफेड करतील.

वीज बिलात ५० टक्के माफी द्यावी व उर्वरित ५० टक्के हप्त्याने वसूल करावेत. गाईच्या दुधाचा प्रति लिटर उत्पादन खर्च ४२ रुपये इतका आहे. २७ रुपये खरेदी दरामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत असल्यामुळे अनेकांनी गुरे सांभाळण्याचे बंद केले आहे. त्यामुळे साडेतीन फॅटच्या दुधाला ४५ रुपये प्रति लिटर इतका दर मिळाला पाहिजे. सोयाबीन साठवण्यासाठी गावोगावी कृषी खाते व ग्रामपंचायतीच्या नियोजनाखाली सरकारी अनुदानित गोदामे बांधण्यात यावीत. त्यामुळे गोदाम पावतीवर शेतकऱ्यांना बँकांतून कर्ज उचल करता येईल.’’ 

या वेळी बाळासो चव्हाण, नवनाथ पोळ, राजेंद्र मोहिते, रामचंद्र कणसे, श्रीकांत शिंदे, शरद गद्रे यांची भाषणे झाली. परिषदेत विविध ठराव करण्यात आले. शितल राजोबा यांनी प्रास्ताविक केले. शेतकऱ्यांनी विविध प्रश्‍नांवर मते मांडली. मोहन परमने, शंकर कापसे, सिद्धाप्पा दानवाडे, अशोक पाटील, अनिल पाटील, किशोर मगदूम, सचिन गवळी, ऋषभ पाटील, सुभाष मद्वाण्णा, वसंत भिसे, रावसो दळवी, धनपाल गळतगे आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...