धान चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

धान चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
धान चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळातर्फे खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल करून चुकारे मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.  

जिल्ह्यात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत धानाची खरेदी होत आहे. मात्र धानाची उचल केली जात नसल्याने पोत्याचे ढीग खरेदी केंद्राच्या परिसरात जमा झाले आहेत. त्यातच पाऊस आल्यास मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. धानाची उचल झाली नसल्याने काही विविध सहकारी संस्थांनी धान खरेदी बंद केली. मार्च महिना जवळ येत आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज भरायचे असल्याने धान विक्रीची लगबग वाढली आहे. परंतु खरेदी बंद पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यात दोन महिन्यांपासून चुकारे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

कुरखेडा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी चिखली फाट्यावर चक्‍काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनाची दखल घेत ठाणेदार सुरेश चिल्लावार यांनी आदिवासी विकास मंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक नीलेश सोरपडे, विपणन निरीक्षकक पंधरे, नायब तहसीलदार सुधाकर मडावी यांना पाचारण केले.

अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करुन आठ दिवसांत चुकाऱ्याचे आश्‍वासन दिले. धानाची उचल करण्याचेही या वेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी या वेळी लेखी आश्‍वासनाची मागणी केली. त्यानुसार त्यांना लेखी देण्यात आले. त्यानंतर आठ दिवसांत आश्‍वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

आंदोलनात गणपत सोनकुसरे, व्यंकटी नागिलवार, धिसू खुणे, यशवंत चौरीकर, गणू उसेंडी, मनोहर लांजेवार, मधुकर शेंडे, रमेश तुलावी, विजय डहाळे, जीवन मेश्राम, दशरथ लाडे, राजेश उईके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभगी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com