चाऱ्यासाठी सायगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

चाऱ्यासाठी सायगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
चाऱ्यासाठी सायगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

अंबाजोगाई, जि. बीड : जनावरांना दावणीला चारा द्यावा, या मागणीसाठी बुधवारी (ता. २८) विविध गावांमधील शेतकऱ्यांनी सायगाव येथे अंबाजोगाई - लातूर राज्य मार्गावर जनावरांसह रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. 

पाऊस नसल्याने बर्दापूर सर्कलसह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे जनावरांना चारा व पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यासाठी तालुक्यात एकही चारा छावणी सुरू नाही. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांची बाजारात विक्री करावी लागत आहे. खरीप येईल आणि चारा व पाण्याचे संकट दूर होईल आशी आशा होती. परंतु तीही आता मावळली आहे. अल्पशा पावसामुळे पिके हातची गेली आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकरी चारा व पाण्याच्या तीव्र टंचाईने त्रस्त आहेत. ४२०० रुपये प्रतिटन या दराने उसाचा चारा खरेदी करावा लागत आहे. हा पैसा आणायचा कोठून हा प्रश्‍न आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या जनावरांना दावणीला चारा द्यावा अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली. 

आंदोलनात बर्दापूर, सायगाव, सुगाव, नांदगाव, पोखरी, मुडेगाव, दैठना आदी गावांमधील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी ‘रास्ता रोको’ करणाऱ्या शेतकऱ्यांची नायब तहसीलदार व मंडळ आधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याचे आश्‍वासन देऊन निवेदन स्वीकारले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com