फायनान्स कंपन्यांना आवर घाला ः आमदार देवेंद्र भुयार 

अमरावती ः अडचणीच्या काळात अनेकांनी फायनान्स कंपन्यांकडून कर्जाची उचल केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे मार्ग बंद असल्याने या कर्जाच्या परतफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिलेल्या पत्राच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली आहे.
Stop finance companies: MLA Devendra Bhuyar

फायनान्स कंपन्यांकडून कर्जावर साहित्य खरेदी करण्यावर नागरिकांचा भर राहतो. याची परतफेड ठरावीक हप्त्याच्या माध्यमातून केली जाते. परंतु सद्यःस्थितीत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. परिणामी रोजगार आणि उत्पन्नाचे स्त्रोतही प्रभावित झाले आहेत. अशाही स्थितीत फायनान्स कंपन्यांकडून कर्जाची परतफेड करण्यास तगादा लावला जात आहे. 

कर्जदारांच्या बॅंक खात्यातून परस्पर पैसे वळते करण्याचेही प्रकार काही ठिकाणी घडत असल्याच्या तक्रारी आहेत. रोजगाराअभावी आधीच अडचणीत असलेल्या सामान्यांच्या समस्यात यामुळे वाढ झाली आहे. खात्यात पैसे नसल्यास व त्यामुळे चेक बाऊन्स झाल्यास त्याचाही भुर्दड कर्जदारांनाच सोसावा लागत आहे किंवा तशी सक्‍ती केली जात आहे. 

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. त्याकरिता फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीस किमान तीन महिन्यांची स्थगिती द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com