Agriculture news in Marathi Stop giving petrol and diesel to farmers | Agrowon

बुलडाण्यात शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल देणे बंद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना पेट्रोल, डिझेल देण्याची मुभा नसल्याने शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर टीका केली आहे.

बुलडाणा ः कोरोना संसर्गाची साखळी मोडून काढण्यासाठी जिल्ह्यात २० मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आल्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसू लागला. शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना पेट्रोल, डिझेल देण्याची मुभा नसल्याने शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर टीका केली आहे. ‘आम्ही आवश्‍यक नाही आहोत काय,’ असा प्रश्‍नच जिल्हा प्रशासनाला केला आहे.

याबाबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत यांनी म्हटले की, जिल्ह्यात १० दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याबाबत आदेश काढताना १६ क्रमांकावर पेट्रोल, डिझेल कोणाला मिळेल याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये शेतकऱ्याला वगळण्यात आले. हे निर्बंध २० मे पर्यंत लागू राहणार आहेत. म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावर सदर कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. ते जनतेच्या जीवांसाठी महत्त्वाचे म्हटले तर शेतकरी हा सुद्धा या समाजव्यवस्थेचा घटक आहे, हे शासन विसरले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. हा प्रकार अन्याय करणार आहे. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार, आमदारांनी तातडीने लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. शेतीच्या मशागतीसाठी डिझेल व पेट्रोल नेहमीप्रमाणे उपलब्ध करण्यासाठी तातडीने शुद्धिपत्रक काढावे, अशी मागणी बानाईत यांनी प्रशासनाकडे केली.

‘स्वाभिमानी’ची ही मागणी
शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता शेतीच्या मशागतीसाठी लागण्याऱ्या यंत्रांना पेट्रोल, डिझेल मिळावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा प्रशासनाने या सामग्रीला पेट्रोल व डिझेल भरायला सूट दिलेली नाही. याबाबत तातडीने सुधारित अध्यादेश काढावा, अशी मागणी डिक्कर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

पेट्रोल, डिझेलबाबत दुपारी निघाले आदेश
कडक संचारबंदी आदेशात शेतकऱ्यांना डिझेल, पेट्रोल मिळणे बंद झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र टीका सुरू झाली होती. जगाचा पोशिंदा महत्त्वाचा नाही का, असे प्रश्‍न विचारणे सुरू झाले. जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. इतर ठिकाणीही लोकप्रतिनिधी पुढे यायला सुरू झाली होती. त्यामुळे प्रशासनाने जागे होत मंगळवारी (ता. ११) दुपारनंतर सुधारित आदेश काढले. यात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांना डिझेल मिळेल, असे म्हटले आहे.

 


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...