संतप्त कांदा उत्पादकांचा नामपुरात रास्ता रोको

संतप्त कांदा उत्पादकांचा नामपुरात रास्ता रोको
संतप्त कांदा उत्पादकांचा नामपुरात रास्ता रोको

नामपूर, जि. नाशिक : नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करंजाड उपबाजार समिती आवारात मंगळवारी (ता. २५) कांदा ५० रुपये क्विंटल अर्थात ५० पैसे किलो दराने विकला गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विंचूर-शहादा-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

कांद्याच्या कमी दरांमुळे कसमादे पट्ट्यातील शेतकरी रडकुंडीला आले आहेत. त्यातच सरकारने केवळ १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये असे तुटपुंजे अनुदान जाहीर केले. त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. दुष्काळात देखील शेतकऱ्यांनी कांदा पिकविला. त्यातच रुपया, दीड रुपया किलो असा भाव मिळत असल्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांदा ओतून शेतकरी आंदोलन करीत आहेत.

बागलाण तालुक्यात यंदा कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. जुन्या कांदा अद्यापही चाळीत शिल्लक आहे. तोच शेतकरी नवीन कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मागणी कमी व पुरवठा जास्त झाल्याने कांद्याचे भाव गडगडले. मंगळवारी शेतकऱ्यानी करंजाड उपबाजार समिती आवारात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी  आणला.

२० शेतकरी ताब्यात

कांदा लिलावास सुरवात होताच एका शेतकऱ्याच्या कांद्याला ५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादकांनी विंचुर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गवर कांदा ओतून निषेध केला. संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला. यामळे महामार्गावर मोठ्या प्रमाणत वाहतूक खोळंबली. कांदा उत्पादक सतीश देवरे, दादा भामरे, वैभव भामरे, दगडू बोरसे, प्रकस बोरसे, राहुल पवार, गोकूळ अहिरे आदींसह २० जणांना जाहखेड पोलिसांनी ताब्यात घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com