‘वसाका’ जमीनधारक कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे

नाशिक : तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन गुरुवारी (ता.२०)दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
stop the hunger strike of ‘Vasaka’ landowners
stop the hunger strike of ‘Vasaka’ landowners

नाशिक  : वसाका कारखाना बंद असल्याने कारखाना उभारण्यासाठी दिलेल्या जमीनधारक कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. या सर्व अडचणी पाहता कारखाना प्रशासनाने बैठा भत्ता द्यावा, नाहीतर जमिनी परत द्याव्या, कारखाना सुरू होईपर्यंत उपासमार टाळावी, या मागण्यांसाठी देवळा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू होते. तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन गुरुवारी (ता.२०)दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. 

डिसेंबर २०१२ पासून कारखाना बंद पडला आहे. पुढे कर्ज थकल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने तो ताब्यात घेतला. २०१७-१८ मध्ये स्थानिक आमदार डॉ. राहुल आहेर यांनी तो चालू केला. हा कारखाना बँकेने कामगार संघटनेला विश्वासात न घेता उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याला सप्टेंबर २०१८ पासून भाडे तत्वावर दिला. मात्र जानेवारी २०१९ पासून भाडेकरू संस्था व बँक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हा कारखाना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे कर्मचारी मोठ्या अडचणीत आहेत. 

तहसिलदार शेजूळ यांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे एकून घेत कारखाना भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या धाराशिव कारखाना प्रशासन, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक यांना उपोषणकर्त्यांच्या भावना कळविण्याचे आश्वासन दिले.

कामगार नेते शशिकांत पवार, वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, वसंत पगार, आनंदा देवरे, प्रताप देवरे, दादाजी सोनवणे, समाधान निकम, निंबा निकम,भरत पवार, हंसराज पवार, सुधाकर सूर्यवंशी, नानाजी पवार, महेंद्र पवार, पोपट वाघ, दोधा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडित निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिरसाठ, कृष्णा जाधव आदी उपस्थित होते.

युती व आघाडी सरकारने लक्ष न दिल्याने कर्मचारी, शेतकरी, सभासद, ऊस तोडणी करणारे मजदूर, ट्रक व ट्रॅक्टर चालक यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या सर्वांना कोणीच वाली नाही. या सर्वांना न्याय मिळेपर्यंत लढा हा सुरूच राहणार आहे. - ज्ञानेश्वर कवडे, जमीनधारक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com