agriculture news in marathi stop import of GM_Soyameal Maharashtra government writes Center | Page 3 ||| Agrowon

सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे केंद्राला पत्र 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021

जीएम सोयापेंडच्या आयातीला मान्यता दिल्याने सोयाबीनचे बाजारभाव पडले आहेत. त्यामुळे सोयापेंड आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. 

पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या आयातीला दिलेली मान्यता शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरेल. अशी मान्यता दिल्याने सोयाबीनचे बाजारभाव पडले आहेत. त्यामुळे सोयापेंड आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. 

कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना खास पत्र लिहून राज्य सरकारच्या भावना कळविल्या आहेत. वाणिज्य मंत्रालयाने २४ ऑगस्टला जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार देशात १२ लाख टन कुटलेली व जीएम गटातील सोयापेंड आयात करण्यास मान्यता दिली आहे.

“केंद्राने सोयापेंड आयातीच्या घेतलेल्या या निर्णयाचे परिणामी देशातील सोयाबीनच्या बाजारांवर होतील. असा निर्णय घेतल्याची बातमी पसरताच बाजारातील घटकांनी लाभ उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यातून सोयाबीनचे बाजारभाव प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपयांनी गडगडले आहेत,” असे ना. भुसे यांनी पत्रात नमूद केले आहे. 

देशातील प्रमुख तेलबिया पीक असलेल्या सोयाबीनची खरिपातील लागवड १२० लाख हेक्टर क्षेत्रावर होते. देशातील एक कोटी शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत, अशी आठवणदेखील या पत्रात करून देण्यात आली आहे. 
“देशात आता सोयाबीनचे उभे पीक काढणीच्या अवस्थेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जीएम सोयापेंड आयातीला दिलेल्या मान्यतेचा निर्णय पुढील बाजारभावांवर प्रतिकूल परिणाम करेल.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आयातीला मान्यता देणाऱ्या निर्णयाचा तुम्ही फेरविचार करावा आणि सोयापेंड आयातीवर तत्काळ बंदी आणावी,” अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.


इतर अॅग्रोमनी
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक...
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...