Agriculture news in marathi Stop import of yellow peas from India | Agrowon

भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 एप्रिल 2021

युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा भारत हा सर्वांत मोठा खरेदीदार देश होता. भारत सरकारने यंदा पिवळ्या वाटाण्याच्या आयातीसाठी कोटा निश्‍चित केला आहे. कोट्याव्यतिरिक्त आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना अत्यंत कठोर अटी घातल्या आहेत.

पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा भारत हा सर्वांत मोठा खरेदीदार देश होता. भारत सरकारने यंदा पिवळ्या वाटाण्याच्या आयातीसाठी कोटा निश्‍चित केला आहे. कोट्याव्यतिरिक्त आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना अत्यंत कठोर अटी घातल्या आहेत. त्यामुळे भारताची सर्वांत मोठी बाजारपेठ हातातून गेल्यामुळे तेथील निर्यातदार नव्या बाजारपेठेच्या शोधात आहेत. याचा परिणाम युक्रेनमधील पिवळ्या वाटाण्याच्या उत्पादनावरही झाला आहे. 

भारतात हॉटेल आणि खाणावळी खर्च कमी करण्यासाठी हरभऱ्याच्या डाळीत पिवळ्या वाटाण्याची भेसळ करतात. त्यामुळे भारताने पिवळ्या वाटाण्याची आयातीवर करड निर्बंध लावले. त्यामुळे भारतातील पिवळ्या वाटाण्याचे किरकोळ बाजारातील दर १०० रुपयांच्या जवळपास आहेत. तसे पाहता, पिवळ्या वाटाण्याची लागवड उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात होते. मात्र देशात पिवळ्या वाटाण्याची १.५ दशलक्ष टन मागणी असते आणि त्या तुलनेत पाच ते सहा लाख टन उत्पादन होते. त्यामुळे पिवळ्या वाटाण्याच्या देशांतर्गत किमतीवर ताण असतो. 

युक्रेनमधून २०१७-१८ या वर्षात ८.७२ लाख टन वाटाण्याची निर्यात झाली होती. ज्यात २०२०-२१ मध्ये घट होऊन ३.६० लाख टनांवर आली आहे. भारताने वाटाण्याची आयात जवळपास बंद केल्यामुळे जगातील सर्वांत मोठा वाटाणा उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या कॅनडाला निर्यात करण्यासाठी आव्हान होते. मात्र कॅनडाकडून चीनने आयात केल्यामुळे कॉनडाची निर्यात आबाधित राहिली. चीनने युक्रेनमधून वाटाण्याच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. असे असले तरी सध्या दोन्ही देश वाटाण्याच्या आयात-निर्याती सुरू करण्यावर चर्चा करत आहेत. 

लवकरच चीनकडून वाटाण्याची आयात सुरू होण्याची युक्रेनला आशा आहे.
ज्या वेळी भारतात वाटाण्याच्या आयातीवर निर्बंध लावण्यात आले आणि सीमाशुल्कातही वाढ करण्यात आली. तोपर्यंत युक्रेनमधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वाटाण्याच्या लागवड क्षेत्रात वाढ केली होती. भारताने आयात बंद केल्यामुळे युक्रेनच्या शेजारील देश असलेल्या रशियामध्ये वाटाण्याच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही. कारण तेथे निर्यातीसोबतच देशांतर्गत वापर मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय युक्रेनच्या तुलनेत रशियाचा वाटाणा स्वस्त असल्याने पाकिस्तान, तुर्की आणि बांगलादेशात याची आयात सुरूच आहे. 

याचाच परिणाम म्हणून रशियामध्ये २०२०-२१ च्या हंगामादरम्यान वाटाण्याचा उत्पादनात वाढून २७.४० लाख टनांवर पोहोचले आहे. यासोबतच रशियामधून २०१९-२० च्या तुलनेत निर्यात ६९ टक्क्यांनी वाढून ९.५० लाख टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. २०२० मध्ये जुलै ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान हॉलंडने युक्रेनमधून सर्वाधिक ५१ हजार टन, स्पेनने ४३ हजार टन, तर इटलीने २२ हजार टन वाटाण्याची आयात केली आहे. याशिवाय युक्रेनमधून तुर्की, मलेशिया, पोलंड, श्रीलंका, येमेन, सूदान आणि बांगलादेश या देशांमध्येही वाटण्याची निर्यात करण्यात आली. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमधून २०२१-२२ च्या हंगामात ४.१५ लाख टन वाटण्याची निर्यात होण्याचा अंदाज आहे.


इतर अॅग्रोमनी
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...