शेतमाल विक्रेत्या शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा : कैलास फाटे

बुलडाणा : शेतकरी उपलब्ध असेल त्याठिकाणी बसून आपला माल रास्त दराने ग्राहकांना विकत आहेत. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास फाटे यांनी केली.
stop Injustice on Fruit, vegetables dealers farmers: Kailas Phate
stop Injustice on Fruit, vegetables dealers farmers: Kailas Phate

बुलडाणा : सध्याच्या परिस्थितीत शेतकरी मोठ्या मेहनतीने विविध प्रकारचा भाजीपाला, फळे विक्री करीत आहे. आज शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाही. उत्पादन खर्च तरी निघावा, या उद्देशाने शहरात जागा उपलब्ध असेल त्याठिकाणी बसून आपला माल रास्त दराने ग्राहकांना विकत आहेत. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास फाटे यांनी केली. 

खामगाव येथे शेतकऱ्यांना पोलिसांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याने त्यांनी नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. 

माल जप्त करणे व सकाळपासून उपाशीपोटी आलेल्या शेतकऱ्याला दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवणे, असे प्रकार खामगावमध्ये होत आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी यातून तातडीने योग्य तोडगा काढावा. अन्यथा, हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा फाटे यांनी दिला. 

‘सोशल डिस्टसिंग’ पाळणे गरजेचे आहे. त्याचे पालन जो करीत नसेल, त्याला दिलेली परवानगी रद्द केली, तर हरकत नाही. परंतु, शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी परवानगी नाकारणे, हे योग्य नाही. शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड व सरपंचाचे भाजीपाला पेरला असल्याचे प्रमाणपत्र आणले, तर त्यांना परवानगी पास देण्यापासून रोखू नये, अशी मागणीही फाटे यांनी केली. 

पोलिस प्रशासनाने सुद्धा भाजीपाला व दूध विक्रेत्यांवर बळाचा वापर करू नये. शेतकरी नियमांचे पालन करीत आहेत. एखादा चुकत असेल, तर त्याला समजावून सांगा, असेही फाटे यांनी म्हटले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com