Agriculture news in marathi Stop looting everywhere, Solve the problems of farmers - Raghunathdada Patil | Agrowon

जागोजागी होणारी लुट थांबवा, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा : रघुनाथदादा पाटील  

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

जागोजागी होणारी लूट थांबवा, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा,’’ अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात बेकायदेशीर लुट सुरू आहे. दूध, शेतमाल व अन्य बाबीतून शेतकऱ्यांची सरळपणे पिळवणूक सुरू आहे. आपण मुख्यमंत्री व्हावे ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण झाली. पण राज्यातील जनता, शेतकऱ्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. तुम्ही लक्ष घाला, जागोजागी होणारी लूट थांबवा, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा,’’ अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘‘महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्याप्रमाणे व्याज आकारणी करणे अपेक्षित आहे. कराड येथील कराड मर्चंट को ऑपरेटिव्ह पतसंस्थेने ३० लाखांवर १ कोटी ७९ लाख रुपयांची आकारणी केली आहे. यावर आम्ही कमिशनर को-ऑपरेटिव्ह पुणे यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी जिल्हा विशेष लेखाधिकारी यांच्याकडे व्याज आकारणीसाठी प्रकरण पाठवले. त्यांनी फक्त ३० लाखांवर ७८ लाख रुपये आकारणी केली. दोन्हींमध्ये १ कोटी १ लाख रुपयांचा फरक आहे. तरीही त्या पतसंस्थेवर कमिशनर कारवाई का नाहीत? सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली, त्यांनी कोर्टात जाण्याचा सल्ला. पाटील यांनी कारवाई करणे अपेक्षित होते.’’ 

साखर कारखान्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला समान दर दिला पाहिजे, असा कायदा असताना काही शेतकऱ्यांना राजाराम बापू पाटील या कारखान्याने ११४ रुपये प्रति टन कमी दिले आहेत. राहुरी तालुक्यातील प्रसाद साखर कारखान्याने प्रति टन दोनशे एकवीस रुपये काही शेतकऱ्यांना कमी दिले. साखर आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांना निर्णय देण्याचा अधिकार नसल्याचे कारखाने म्हणू लागले आहेत. त्‍यामुळे सरकारकडे मार्गदर्शन मागवले. त्यावर निर्णय नाही, या दोन्ही साखर कारखान्याचे नेते मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यामुळे आमचा निर्णय अडकून राहिला व शेतकऱ्यांचे करोडो रुपये, या कारखान्याने हडप केले आहेत. 

आपल्या सरकारच्या कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. सांगली येथील मास्तोळी नावाच्या अधिकाऱ्याची गेले वर्षभर चौकशी चालू आहे, निर्णय होत नाही. आंबेजोगाई (जि. बीड) येथील गोडाऊन किपरने कोट्यवधी रुपयाची शेतकऱ्यांसाठी साधन सामग्री परस्पर बाजारात विकली. त्या बाबत संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी तक्रार केली. मात्र प्रकरणाची चौकशी न होता फक्त बदली झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गाईच्या दुधाचे प्रति लिटर २७ रुपये देण्याचे ठरले होते. परंतु एकाही दूध संकलन करणाऱ्या सहकारी संघाने हे भाव दिले नाहीत. आता तुम्ही तरी लक्ष घालून राज्यातील शेतकरी, नागरिकांना न्याय द्या. 


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...