Agriculture news in Marathi, Stop the path of Parbhanik Farmers' Conflict Committee | Agrowon

परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे गुरुवारी (ता. १४) परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे गुरुवारी (ता. १४) परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

जिल्ह्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे सार्वत्रिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाईच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील पेडगाव, पाथरी, झिरोफाटा, झरी आदी ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये राजन क्षीरसागर, माणिक कदम, लक्ष्मण काळे, प्रसाद गोरे, माधुरी क्षीरसागर आदीसह शेतकरी सहभागी झाले होते. 

शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्या ः 

  • पीकविमा योजनेतील खरीप पिकांचे, सोयाबीनचे पीककापणी प्रयोग तत्काळ रद्द करावेत. 
  • २५ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र असल्याने सरसकट संपूर्ण पीकविमा भरपाई सरसकट अदा करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिसूचना तत्काळ जारी करावी. 
  • बेमोसमी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी, ज्वारी, मका या पिकांची संपूर्ण विमा जोखीम रक्कम म्हणजेच सोयाबीनसाठी हेक्टरी ४३ हजार रुपये तत्काळ अदा करण्यात यावेत. 
  • पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांना विमाधारकाप्रमाणेच शासकीय मदत अदा करावी. त्यासाठी केंद्र शासनाचे निकष रद्दबातल करून राज्य शासनाने स्वतंत्र आपत्ती कोशातून मदत द्यावी. 
     

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...