agriculture news in marathi Stop the path of 'Swabhimani' at Kasola fork | Agrowon

कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २१)  कासोळा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ‘स्वाभिमानी’च्या या आंदोलनामुळे माहूर- पुसद मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. 

यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २१)  कासोळा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ‘स्वाभिमानी’च्या या आंदोलनामुळे माहूर- पुसद मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. 

महागाव, पुसद व उमरखेड तालुक्यात सरासरीपेक्षा पाचपट अधिक पावसाची नोंद झाली. याचा फटका जिल्ह्यात सर्वदूर बसला. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद ही पिके उध्वस्त झाली. याची जिल्हा प्रशासनाला देखील माहिती असून प्रशासनाकडून बांधावर जात पाहणी करण्यात आली. सर्वेक्षण व पंचनाम्याची गाडी मात्र पुढे सरकली नाही. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. याची तातडीने दखल घेत प्रशासनाने सर्वेक्षण पंचनामे करावे, अशी मागणी संघटनेने केली.

या मागणीच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी कडून ‘रास्ता रोको’चा इशाराही देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून या मागणीची दखल घेण्यात  न आल्याने अखेरीस बुधवारी माहूर पुसद मार्गावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे या राज्य मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. खरीप २०२० २१ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, सोयाबीन, कापूस व अन्य पिकांना पीक विम्याची सरसकट भरपाई द्यावी, सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया न करताच थेट आर्थिक मदत जाहीर करावी, ही मदत कमीत कमी ५० हजार रुपये असावी,  निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यासह सर्व खर्च द्यावा, वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेत कुंपणाची अनुदान योजना राबवावी आदी मागण्या करण्यात आल्या. 

जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर गहू- हरभरा बियाणे उपलब्ध करून द्यावे, ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा निर्णय घ्यावा अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. कासोळा सरपंच रंजना फोपसे,  ग्रामपंचायत सदस्य, शंकर राठोड, विजय राठोड, सुधाकर डाखोरे, निवृत्ती राठोड, किशोर राठोड यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...