Agriculture news in marathi stop the 'Prahar' movement in Yeola | Agrowon

येवल्यातील ‘प्रहार’चे आंदोलन मागे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

नाशिक :येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी  पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र पंचायत समितीने लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरुवार (ता.३०) उपोषण मागे घेण्यात आले.

नाशिक : शेतकऱ्यांना युरिया मिळताना अडचणी येत आहेत. साठा येतो, मग जातो कुठे, असा प्रश् उपस्थित करू‍न येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.२७) उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र पंचायत समितीने लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरुवार (ता.३०) उपोषण मागे घेण्यात आले.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी यांच्याकडे जिल्ह्यासाठी संरक्षित असलेल्या युरिया साठ्यातून १०० टन युरिया व लगतच्या कालावधीत जिल्ह्यासाठी प्राप्त होणाऱ्या रॅकमधून ई-पॉस धारकांना खत द्यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली. यासह प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना लेखी देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

ग्रामीण तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी, पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, कृषी अधिकारी प्रशांत वास्ते, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, विस्तार अधिकारी अन्सार शेख उपस्थित होते.

पत्रानुसार, येत्या २ ते ३ दिवसांत तालुक्यास २०० टन युरिया आणण्याची मागणी केली. हा खत साठा प्राप्त झाल्यानंतर विक्री करताना कुठल्याही प्रकारचे लिंकिंग किंवा इतर खते घेण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये, यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. असा प्रकार आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, वसंतराव झांबरे, रामभाऊ नाईकवाडे, भागवत भड, संतोष रंधे यांसह एकूण १७ कार्यकर्ते उपोषणात सहभागी 
होते.
 


इतर बातम्या
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
सौर कृषिपंप योजनेच्या कामांना वेग द्या...सोलापूर : ‘‘एचव्हीडीएस आणि मुख्यमंत्री सौर...
युवकांनो शेतमाल विक्रीचे नियोजन करा :...जालना : ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विकेल तेच...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी एकत्र...नाशिक  ः ‘‘आदिवासी बांधवांना रोख...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
काकडा परिसरात बाधित क्षेत्राला...काकडा, जि. अमरावती : गेल्या आठवड्यात झालेल्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...