परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ

परराज्यांतील भात (धान) चोरट्या मार्गांनी जिल्ह्यात आणला जातो. परिणामी, आपल्या शेतकऱ्यांचे पर्यायाने राज्याचे नुकसान होते. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. जिल्हा प्रशासनाने राज्य सीमेवरच अशा लोकांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करा.
परराज्यांतील भात रोखा Stop rice in foreign countries
परराज्यांतील भात रोखा Stop rice in foreign countries

गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या मार्गांनी जिल्ह्यात आणला जातो. परिणामी, आपल्या शेतकऱ्यांचे पर्यायाने राज्याचे नुकसान होते. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. जिल्हा प्रशासनाने राज्य सीमेवरच अशा लोकांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करावी, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. गडचिरोली येथे दौऱ्यावर असताना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, ‘‘पोलिस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनाने योग्य तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. जिल्ह्यात धान उत्पादन जास्त असून, बाहेरील धान जिल्ह्यात चोरून आल्यास येथील धान खरेदी आणि साठवणुकीवर ताण येतो. यात राज्य शासनाचा पैसा वाया जातो. त्यामुळे परराज्यांतील धानावर कारवाई करून आपल्या शेतकऱ्यांचे धान शंभर टक्के खरेदी केंद्रांवर पोहोचेल, यासाठी नियोजन करा.’’  आढावा बैठकीला आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, नागपूर विभागाचे पुरवठा उपायुक्त रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे, टीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार, वैधमापन विभागाचे सहनियंत्रक बिरादार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपस्थित होते.

गोदामे उपलब्ध करून द्या मागील वर्षी धान साठवणुकीला, भरडाईला मोठ्या अडचणी आल्या होत्या. मात्र यावेळी जिल्ह्यात चांगले नियोजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. टीडीसीसाठी खरेदी केंद्रालगत आवश्यक गोदामे उपलब्ध होण्यासाठी गरजेनुसार तालुकानिहाय प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी संबंधित विभागास दिले. राज्य शासन अन्न, नागरी पुरवठ्यामधून धान्यवाटपाबरोबर धान खरेदीबाबत कोट्यवधी रुपये खर्च करत असते. यासाठी या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करा. यातून गरजू नागरिक व आपल्याच शेतकऱ्यांना फायदा होईल. म्हणून धान भरडाई वेळेत न करणाऱ्या मिलसह परराज्यांतील धान आणणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. रेशन दुकानांत  महिला यशस्वी राज्यात मोठ्या प्रमाणात रेशनिंगची दुकाने महिला बचत गटांकडून चालविली जातात. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पात्रतेनुसार महिला बचत गटांना दुकाने चालविण्यास द्यावीत, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या. गडचिरोली जिल्ह्यात ११९६ रेशन दुकाने कार्यरत असून, दोन्ही प्रकारच्या कार्डधारकांची संख्या एकूण २ लाख १० हजार ६५८ इतकी असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या वेळी दिली. सध्या नवीन रेशन दुकानांसाठी १७० गावांमधून ३३० अर्ज आले असून, त्याची छाननी सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com