Agriculture News in Marathi Stop rice in foreign countries | Page 3 ||| Agrowon

परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

परराज्यांतील भात (धान) चोरट्या मार्गांनी जिल्ह्यात आणला जातो. परिणामी, आपल्या शेतकऱ्यांचे पर्यायाने राज्याचे नुकसान होते. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. जिल्हा प्रशासनाने राज्य सीमेवरच अशा लोकांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करा. 

गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या मार्गांनी जिल्ह्यात आणला जातो. परिणामी, आपल्या शेतकऱ्यांचे पर्यायाने राज्याचे नुकसान होते. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. जिल्हा प्रशासनाने राज्य सीमेवरच अशा लोकांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करावी, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

गडचिरोली येथे दौऱ्यावर असताना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, ‘‘पोलिस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनाने योग्य तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. जिल्ह्यात धान उत्पादन जास्त असून, बाहेरील धान जिल्ह्यात चोरून आल्यास येथील धान खरेदी आणि साठवणुकीवर ताण येतो. यात राज्य शासनाचा पैसा वाया जातो. त्यामुळे परराज्यांतील धानावर कारवाई करून आपल्या शेतकऱ्यांचे धान शंभर टक्के खरेदी केंद्रांवर पोहोचेल, यासाठी नियोजन करा.’’ 
आढावा बैठकीला आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, नागपूर विभागाचे पुरवठा उपायुक्त रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे, टीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार, वैधमापन विभागाचे सहनियंत्रक बिरादार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपस्थित होते.

गोदामे उपलब्ध करून द्या
मागील वर्षी धान साठवणुकीला, भरडाईला मोठ्या अडचणी आल्या होत्या. मात्र यावेळी जिल्ह्यात चांगले नियोजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. टीडीसीसाठी खरेदी केंद्रालगत आवश्यक गोदामे उपलब्ध होण्यासाठी गरजेनुसार तालुकानिहाय प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी संबंधित विभागास दिले. राज्य शासन अन्न, नागरी पुरवठ्यामधून धान्यवाटपाबरोबर धान खरेदीबाबत कोट्यवधी रुपये खर्च करत असते. यासाठी या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करा. यातून गरजू नागरिक व आपल्याच शेतकऱ्यांना फायदा होईल. म्हणून धान भरडाई वेळेत न करणाऱ्या मिलसह परराज्यांतील धान आणणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

रेशन दुकानांत 
महिला यशस्वी

राज्यात मोठ्या प्रमाणात रेशनिंगची दुकाने महिला बचत गटांकडून चालविली जातात. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पात्रतेनुसार महिला बचत गटांना दुकाने चालविण्यास द्यावीत, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या. गडचिरोली जिल्ह्यात ११९६ रेशन दुकाने कार्यरत असून, दोन्ही प्रकारच्या कार्डधारकांची संख्या एकूण २ लाख १० हजार ६५८ इतकी असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या वेळी दिली. सध्या नवीन रेशन दुकानांसाठी १७० गावांमधून ३३० अर्ज आले असून, त्याची छाननी सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...