हळदीच्या दुष्काळी मदतीसाठी शिवसंग्रामचा रिसोड येथे रास्ता रोको

हळदीच्या दुष्काळी मदतीसाठी शिवसंग्रामचा रिसोड येथे रास्ता रोको
हळदीच्या दुष्काळी मदतीसाठी शिवसंग्रामचा रिसोड येथे रास्ता रोको

वाशीम : हळद उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ दुष्काळी मदत द्यावी, या मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे रिसोड येथे लोणी फाटा परिसरात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. 

जिल्ह्यात रिसोड तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना शासनातर्फे दुष्काळी मदत देण्यात येत आहे. परंतु शासन व प्रशासनाकडून हळद उत्पादक शेतकऱ्यांना दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. शिवसंग्रामचे वाशीम जिल्हाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. 

भुतेकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना दुर्लक्षित करणाऱ्या कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही. शिवसंग्राम सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकऱ्यांना गृहीत धरणाऱ्या पुढाकाऱ्यांना सुद्धा येणाऱ्या काळात शिवसंग्राम त्यांची जागा दाखवेल.’’ 

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयराव गाडे, शिवसंग्राम तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, बाजार समितीचे संचालक तथा मोहजा इंगोलेचे सरपंच घनश्याम मापारी, रवींद्र चोपडे, शंकरराव मुढे, संजय सदार, पुरुषोत्तम रंजवे, राजू डांगे,  शिवराज कुबडे, डॉ. जितेंद्र गवळी, श्रीरंग नागरे, आर. बी. खडसे, अमर दहीहांडे, विकास झुंगरे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com