कर्मचाऱ्यांनी मांडले एकाच जागेवर ठाण

कर्मचाऱ्यांनी मांडले एकाच जागेवर ठाण
कर्मचाऱ्यांनी मांडले एकाच जागेवर ठाण

जळगाव : कर्मचाऱ्यांची एकाच जागेवर तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी नियुक्ती असू नये, एकाच विभागात पाच वर्षांपेक्षा संबंधित कर्मचाऱ्याने काम करू नये, याबाबतच्या नियमांची पायमल्ली जिल्हा परिषदेत प्रशासन सर्रास होत आहे. काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच जागेवर ठाण मांडून असल्याचे चित्र आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांमध्येही तक्रारी आहेत. परंतु संबंधित कर्मचारी आपली नियुक्ती वाचविण्यासाठी सदस्य, संघटनांमधील पदाधिकाऱ्यांची छुप्या पद्धतीने मदत घेऊन ठाण मांडून आहेत. परिणामी संबंधित टेबलवरील कामाची मक्तेदारी एखाद्या कर्मचाऱ्याकडेच राहिली आहे. 

विभागात दरवर्षी टेबल बदलण्याचा, संबंधित कर्मचाऱ्याला दुसरे काम देण्याचा संकेत आहे. परंतु तो मोडला जातो. यामुळे फायलींची अडवणूक, कामे अडविण्यासाठी वारंवार सुटीवर राहणे, विभागातून गायब राहणे, असे प्रकार होत आहेत. पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन, ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य आणि समाज कल्याण विभागात काही कर्मचारी पाच ते सात वर्षांपासून ठाण मांडून आहेत. 

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, नंतर दीपक मुगळीकर यांनी विभाग बदलाची कार्यवाही केली. परंतु काही कर्मचारी प्रतिनियुक्ती घेऊन पुन्हा संबंधित विभागात दाखल झाले. या प्रकारामुळे अप्रत्यक्षपणे विकास कामांवर परिणाम होत असून, जिल्हा परिषदेतील कारभार काही कर्मचारी व पदाधिकारी यांच्या हातात एकवटल्याच्या तक्रारी विरोधक करीत आहेत. पाणीपुरवठा, बांधकाम विभागात मर्जीच्या प्रकरणांमध्ये या ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग नेहमीच दिसून येतो, अशी चर्चाही काही संघटनांमध्ये दबक्‍या आवाजात सुरू आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com