Agriculture news in marathi, 'Stop way' for the salary of Adinath workers | Agrowon

‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘रास्ता रोको'
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने थकित पगार मिळावा, या मागणीसाठी ‘आदिनाथ''च्या कामगारांनी शुक्रवारी (ता.२०) रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात कामगारांच्या पत्नी, मुलांनी भाग घेतला. मौलालीनगर येथे नगर-टेंभुर्णी रस्त्यावर दीड तास ‘रास्ता रोको'' करण्यात आला. 

सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने थकित पगार मिळावा, या मागणीसाठी ‘आदिनाथ''च्या कामगारांनी शुक्रवारी (ता.२०) रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात कामगारांच्या पत्नी, मुलांनी भाग घेतला. मौलालीनगर येथे नगर-टेंभुर्णी रस्त्यावर दीड तास ‘रास्ता रोको'' करण्यात आला. 

या आंदोलनाचे नेतृत्व कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब साखरे व बहुजन वंचित आघाडीचे कांबळे यांनी केले. या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे कारखान्याच्या नेत्या रश्‍मी बागल, दिग्विजय बागल यापैकी कोणीही फिरकले नाही. याविषयी महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. पगाराच्या मागणीसाठी आज तब्बल २०० कामगार व त्यांच्या कुटुंबातील महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

दीड तास ‘रास्ता रोको‘ आंदोलन झाल्याने येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाला भाजपचे युवानेते शंभूराजे जगताप, कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत, शहाजी ठोसर, बाबा बोडके, सुभाष ओहोळ यांनी पाठिंबा दिला. 

आश्‍वासनानंतर उपोषण मागे 

कारखान्यातील दिव्यांग कर्मचारी महादेव मस्के यांनी तीन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नायब तहसीलदार शांताराम किरवे व पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन ते मागे घेण्यात आले. या वेळी आमदार नारायण पाटील, सभापती शेखर गाडे, जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, शहरप्रमुख प्रवीण कटारिया, अतुल पाटील, दत्ता सरडे उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...