Agriculture news in marathi, Stop the way for Ujani water by Kisan sabha in barshi | Agrowon

उजनीच्या पाण्यासाठी बार्शीत किसान सभेचा रास्ता रोको

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

सोलापूर : उजनीचे पाणी ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्पात सोडावे, यासाठी अखिल भारतीय किसान सभेने तुळजापूर रस्त्यावरील शेलगाव चौकात गुरुवारी (ता. २९) रास्ता-रोको आंदोलन केले. बावी, पिंपळगाव, मळेगाव, महागाव, खांबगाव, साकत, पानगाव, कळंबवाडी, चिखर्डे, तांदूळवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यात भाग घेतला. 

चार-पाच दिवसांपूर्वीच किसान सभेने याच प्रश्नावर आंदोलन केले होते. त्यानंतरही दखल घेतली गेली नसल्याने आता पुन्हा रास्ता-रोको करण्यात आला. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. 

ठोंबरे म्हणाले, ‘‘आमच्या संघटनेने तहसीलदारांना पहिले निवेदन देऊन १५ दिवस झाले. हे दुसरे आंदोलन होत आहे. परंतु, प्रशासन काहीच करत नाही. ९, १० व ११ सप्टेंबर रोजी धरणे व उपोषण करण्यात येईल.’’ 

बार्शी तालुका अध्यक्ष लक्ष्मण घाडगे, उपाध्यक्ष लहू आगलावे यांचे भाषण झाले. आंदोलनात ए. बी. कुलकर्णी, धनाजी पवार, प्रवीण मस्तुद, शौकत शेख उपस्थित होते.

इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...