दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील बाराशे ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प
नगर : ‘सरकारकडून आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी,’ अशी आक्रमक भूमिका घेत राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी गुरुवारपासून (ता. २२) ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. या सर्व ग्रामसेवकांनी आपल्याकडील कपाटे व दफ्तराच्या किल्ल्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. जिल्ह्यातील १२०५ ग्रामपंचायतींना या आंदोलनाचा फटका बसला असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकासकामे पूर्ण होतील का, ही शंकाच आहे.

जिल्ह्यात ९५२ ग्रामसेवक व २५३ ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यांपैकी ८४३ ग्रामसेवक व २२६ ग्रामविकास अधिकारी, असे एकूण एक हजार ६९ जण कार्यरत आहेत. आंदोलन सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील २२ ग्रामसेवक रजेवर होते. ग्रामसेवक संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील ९४४ ग्रामसेवक सहभागी झाले. ग्रामपंचायतींच्या कामावर परिणाम होऊ नये, म्हणून पंचायत समितीतून काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काही ठिकाणी अशा नियुक्त्या झाल्या असल्या, तरी अशा एका कर्मचाऱ्याकडे अनेक ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सध्या सुरू आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यता आहे. ग्राम स्तरावरील विकासकामे या आंदोलनामुळे प्रलंबित राहिली आहेत. सरकारने या प्रकरणांत लवकर तोडगा काढल्यास ही कामे वेळेत मार्गी लागतील, अशी अपेक्षा, ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी नियुक्त ग्रामीण भागात ग्रामसेवकांवर मोठी जबाबदारी असते. सध्या ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्याने कामकाजावर बाधा येऊ नये यासाठी पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारीची दखल घ्यावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कामकाज बाधित होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. तातडीच्या कामासाठी पंचायत समिती स्तरावरून काही कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील १०३ कंत्राटी ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झालेले नाहीत.
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)