हतनूर धरणाची साठवण क्षमता घटली

भुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या तापी नदीवरील हतनूर धरणाची पाणी साठवण क्षमता फक्त ४६ टक्के एवढीच राहिली आहे. धरणात तब्बल ५४ टक्के गाळ आहे. यामुळे मध्यम पाऊस झाला तरी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत.
The storage capacity of Hatnur Dam decreased
The storage capacity of Hatnur Dam decreased

भुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या तापी नदीवरील हतनूर धरणाची पाणी साठवण क्षमता फक्त ४६ टक्के एवढीच राहिली आहे. धरणात तब्बल ५४ टक्के गाळ आहे. यामुळे मध्यम पाऊस झाला तरी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत.

यंदा तीनदा धरणाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. जूनच्या मध्यात सुमारे ३२ दरवाजे उघडले होते. नंतर या महिन्यातही ३२ दरवाजे उघडले. तापी नदीला विदर्भातून येणारी पूर्णा नदीही मुक्ताईनगर (जि. जळगाव) नजीक येऊन मिळते. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल भागात आहे. सातपुडा पर्वतातून येणाऱ्या अनेक उपनद्या, नालेही तापी नदीला येऊन मिळतात. या धरणात जलसाठा चांगला होऊ शकतो. कारण पाणलोट क्षेत्र मोठे आहे; परंतु त्याची साठवण क्षमता मागील १० वर्षांत झपाट्याने कमी झाली आहे.

‘मेरी’ या संस्थेने सॅटेलाइटच्या मदतीने हतनूर धरणातील गाळाचे सर्व्हेक्षण व इतर माहिती गोळा केली आहे. त्याची माहिती जलसंपदा विभागाकडे लागलीच पाठविलीदेखील आहे. मागील ३५ वर्षांत गाळ सतत वाढला. आजघडीला ५४ टक्के गाळ झाला आहे. धरणाची साठवण क्षमता ३७७ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. त्यात २०८ दशलक्ष घनमीटर गाळ आहे. यामुळे त्यात १८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राहू शकतो. ही चिंतेची बाब आहे.

धरणातील गाळ उपसण्यासाठी आता मोठा निधी लागू शकतो. तो उभारणे कठीण आहे. हतनूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे चोपडा, रावेर व यावल तालुक्‍यातील शेतीला लाभ होतो. पूर्वी धरणातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासंबंधी कालव्यातून सोडले जायचे. आता फक्त १८ दशलक्ष घनमीटर पाणी कालव्यात सोडले जाते. २०१९ च्या उन्हाळ्यात धरण कोरडेठाक पडले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com