खरेदी केंद्रावर हवी साठवणुकीची सुविधा

शासकीय खरेदी केंद्रावर साठवणूक क्षमता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल उघड्यावर ठेवावा लागतो. सध्या अवकाळी पावसाचे संकट असल्याने उघड्यावरील माल भिजून नुकसान होण्याची शक्यता आहे.
Storage facility required at the shopping center
Storage facility required at the shopping center

अमरावती : शासकीय खरेदी केंद्रावर साठवणूक क्षमता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल उघड्यावर ठेवावा लागतो. सध्या अवकाळी पावसाचे संकट असल्याने उघड्यावरील माल भिजून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना माल साठवण्यासाठी व्यवस्था करून देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.  शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे बरेच शेतकरी माल घेऊन येत आहेत. परंतु तेथील माल साठवणूक क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांना आपला मार्ग मोकळ्या जागेत ठेवावा लागतो. हवामान खात्याने सध्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अशा वेळी खुल्या जागेतील शेतीमाल पावसाने ओला झाल्यास नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर साठवणुकीची पर्याप्त सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुधाकर दोड, धनंजय बोकडे, नरेंद्र पावडे, राहुल चौधरी, बंटी रडके, बाबाराव भोंड, बबलू आवारे, शहजाद शहा, आसिफ शेख, सतीश धोटे, शोएब मिर्झा व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com