Agriculture news in marathi Storage facility required at the shopping center | Agrowon

खरेदी केंद्रावर हवी साठवणुकीची सुविधा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

शासकीय खरेदी केंद्रावर साठवणूक क्षमता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल उघड्यावर ठेवावा लागतो. सध्या अवकाळी पावसाचे संकट असल्याने उघड्यावरील माल भिजून नुकसान होण्याची शक्यता आहे.

अमरावती : शासकीय खरेदी केंद्रावर साठवणूक क्षमता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल उघड्यावर ठेवावा लागतो. सध्या अवकाळी पावसाचे संकट असल्याने उघड्यावरील माल भिजून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना माल साठवण्यासाठी व्यवस्था करून देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे बरेच शेतकरी माल घेऊन येत आहेत. परंतु तेथील माल साठवणूक क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांना आपला मार्ग मोकळ्या जागेत ठेवावा लागतो. हवामान खात्याने सध्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अशा वेळी खुल्या जागेतील शेतीमाल पावसाने ओला झाल्यास नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर साठवणुकीची पर्याप्त सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुधाकर दोड, धनंजय बोकडे, नरेंद्र पावडे, राहुल चौधरी, बंटी रडके, बाबाराव भोंड, बबलू आवारे, शहजाद शहा, आसिफ शेख, सतीश धोटे, शोएब मिर्झा व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.  


इतर बातम्या
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारात तूर आवक वाढली; दरातही सुधारणा पुणेः देशातील बाजारांमध्ये तुरीची आवक वाढली आहे....
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
वंध्यत्व निवारण शिबिरातून दूध...नागपूर : ‘‘विदर्भ व मराठवाडा दूध विकास...
नाशिकच्या स्वयंम पाटील यास प्रधानमंत्री... नाशिक: जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा...
वीजतोडणीमुळे शेतकरी संतप्त भंडारा : निवडणुकीचे निकाल लागताच सरकारने भंडारा...
‘महाबीज’चा सोयाबीन बियाणे देण्यास नकारसांगली ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता...
वीजपुरवठा सुरळीत करा; ‘बळिराजा’ची मागणीजालना : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून...
औरंगाबादमध्ये भूसंपादन मोबदल्यासाठी...औरंगाबाद : निम्न दुधना प्रकल्पाचा जलसाठा ५० टक्के...
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...