मन्याड, भोकरबारी प्रकल्पांचा साठाही प्लसमध्ये

मन्याड, भोकरबारी प्रकल्पांचा साठाही प्लसमध्ये
मन्याड, भोकरबारी प्रकल्पांचा साठाही प्लसमध्ये

जळगाव  ः खानदेशात पावसाची संततधार सुरू असल्याने पिकांना फटका बसत असला तरी जलसाठा वाढत आहे. पाणीटंचाईची समस्या बऱ्यापैकी दूर होईल अशी स्थिती असून, जळगाव जिल्ह्यात कोरडेठाक असलेल्या मन्याड वा भोकरबारी प्रकल्पांतील जलसाठा या पावसाने प्लसमध्ये पोचला आहे.  मन्याड प्रकल्प चाळीसगावमध्ये असून, त्यात गुरुवारी (ता. २६) सकाळी १४ टक्के जलसाठा होता. तर भोकरबारीमधील साठाही १० टक्के झाला. धुळ्यातील अनेक वर्षे रिकाम्या असलेल्या कनोली प्रकल्पात साठा मागील ८-१० दिवसांत झपाट्याने वाढून हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. तर धुळे तालुक्‍यातील सोनवद प्रकल्पदेखील ७२ टक्के भरला आहे. पांझरा नदीच्या कालव्याच्या माध्यमातून हा प्रकल्प भरत आहे. धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, बुराई, जामखेडी, करवंद हे प्रकल्प यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले होते. शिंदखेडा तालुक्‍यातील अमरावती प्रकल्पातूनही विसर्ग सुरू आहे. त्यात गुरुवारी सकाळी ९० टक्के जलसाठा होता. जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर, सुकी, अभोरा, वाघूर, गिरणा, बोरी, हिवरा, अंजनी हे प्रकल्पदेखील पूर्ण भरले आहेत. तर पाचोरा (जि. जळगाव) नजीकच्या बहुळा प्रकल्पातील साठा ९६ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे.  जळगाव जिल्ह्यात वाघूर, सुकी, गूळ आदी, धुळ्यात जामखेडी तर नंदुरबारात रंगावली व शिवन प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. वाघूर प्रकल्पाचे आठ दरवाजे गुरुवारी सकाळी ३० सेंटिमीटरने उघडे होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com