Agriculture news in marathi Storm to banana growers Just waiting for compensation | Page 2 ||| Agrowon

केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची प्रतीक्षाच

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी आलेल्या जोराचा वारा व वादळामुळे केळीचे अतोनात नुकसान झाले होते. त्यासाठी विम्याचा लाभ मिळावा म्हणून शेतकरी प्रशासनाने पाठपुरावा करीत आहेत.

अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी आलेल्या जोराचा वारा व वादळामुळे केळीचे अतोनात नुकसान झाले होते. त्यासाठी विम्याचा लाभ मिळावा म्हणून शेतकरी सातत्याने प्रशासनाने पाठपुरावा करीत आहेत. यंदा मार्च महिन्यात अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चाही काढण्यात आला. तेव्हा तातडीने कारवाईचे आश्‍वासन देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत मात्र, जिल्ह्यातील केळी उत्पादकांना काहीही मिळालेले नाही.

२२ मार्च २०२१ रोजी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात केळी उत्पादकांचा मोर्चा काढण्यात आला होता. पणज मंडळातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेत चर्चा केली. या बैठकीत एनडीआरएफच्या झालेल्या पंचनाम्यानुसार ताळमेळ करून आणि योग्य चौकशी करीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत तेव्हा शेतकऱ्यांना लेखी पत्रही देण्यात आले होते.

वस्तुस्थिती दर्शक अहवाल विमा कंपनीला सादर करून तत्काळ भरपाई देण्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, या बैठकीनंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पणज ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर पत्र लिहिले आहे.

तोडगा काढण्याची मागणी
या प्रकरणी कृषी विभागाने तातडीने तोडगा काढावा. केळी उत्पादकांना विमा मिळवून देण्यासाठी काय कारवाई झाली त्याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. सात दिवसांत या बाबत काहीही न झाल्यास पुन्हा रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...