सोलापूर : वादळी पाऊस पाठ सोडेना

गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत असून, जिल्ह्यातील विविध तालुक्यात काढणीस आलेल्या पिकांसह द्राक्ष, आंबा या फळबागांचे नुकसान होत आहे.
वादळी पाऊस पाठ सोडेना The storm did not leave behind
वादळी पाऊस पाठ सोडेना The storm did not leave behind

सोलापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत असून, जिल्ह्यातील विविध तालुक्यात काढणीस आलेल्या पिकांसह द्राक्ष, आंबा या फळबागांचे नुकसान होत आहे. मंगळवारी (ता. १३) पुन्हा पंढरपूर, बार्शी, माढ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.

गेल्या शनिवारपासून रोज सायंकाळी पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी आणि सोमवारी अनेक भागात या पावसाने नुकसान केल्याचे चित्र असताना, मंगळवारी (ता. १३) पुन्हा हजेरी लावून मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे मंगळवारी दिवसभर कडाक्याचे ऊन होते. पण सायंकाळी पाचनंतर वातावरणात एकदम बदल झाला आणि पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पाचपासून रात्री नऊ वाजेपर्यंत अनेक भागात थांबून-थांबून त्याची रिपरिप सुरू होती.  बार्शी, माढ्यात या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे, कडब्याच्या गंजी उडाल्या. त्या शिवाय रब्बी पिकांचे नुकसान झाले.

काढणीला आलेल्या आंबा, द्राक्ष फळबागांना मोठा फटका बसला. करकंब भागातील बालाजी चव्हाण यांची काढणीला आलेली द्राक्षबाग एकाच रात्रीत जमिनीवर कोसळली. जाधववाडी, नेमतवाडी, बार्डी या भागात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. माढा, बार्शीसह अक्कलकोट तालुक्यात ढगाळ वातावरण राहिले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अंधारून आले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. 

रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. या पावसामुळे द्राक्ष, लिंबू, आंबा, केळी बागांना फटका बसला. गहू, ज्वारीची मळणी सुरू आहे. शेतात खळ्यावर टाकलेली ज्वारीची कणसे भिजली. कापणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले. मोहोळ तालुक्यातील पेनूर, खंडाळी, पापरी, बिटले परिसरात या पावसाने नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com