Agriculture news in Marathi, Stormy rain in the district continues | Agrowon

पुणे जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका सुरूच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून वादळी पावसाचा दणका सुरूच आहे. गुरुवारी (ता. १०) रात्री जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. 

सतत पडणाऱ्या पावसाने काढणीस आलेल्या खरीप पिके, भाजीपाला, फुलपिकांचे नुकसान आहे. तर बारामती, इंदापूर, दौंड, शिरूरसह कोरडवाहू तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ होणार आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून वादळी पावसाचा दणका सुरूच आहे. गुरुवारी (ता. १०) रात्री जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. 

सतत पडणाऱ्या पावसाने काढणीस आलेल्या खरीप पिके, भाजीपाला, फुलपिकांचे नुकसान आहे. तर बारामती, इंदापूर, दौंड, शिरूरसह कोरडवाहू तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ होणार आहे. 

जवळपास आठवडाभरापासून सकाळी कडक ऊन, दुपारी ढगाळ हवामानासह उकाडा आणि रात्री वादळी वारे विजांसह जोरदार सरींचा पाऊस पडत आहे. तुरळक स्वरूपात गाराही पडत आहे. गुरुवारी रात्री उशिरा हवेली, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यांत जोरदार तर उर्वरित तालुक्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. 

हवेली तालुक्यातील खेड-शिवापूर परिसराला पावसाने झोडपले. सुमारे दोन तास झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले. गोगलवाडी, शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, श्रीरामनगर, खेड-शिवापूर या गावांना जोरदार पावसाने झोडपून काढले. या पावसाने ओढे नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पावसामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले असतानाच, परतीचा पाऊस रब्बीच्या पेरण्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. 

बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड तालुक्‍यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्यांना सुरवात झाल्याने या भागातील शेतकरी कामात व्यस्त आहेत. ज्वारी, बाजरी, मका इत्यादींच्या पेरण्या सुरू झाल्या असून, लवकरच हरभरा, गव्हाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...