agriculture news in marathi, stormy rain in district, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार सरी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पुणे  : जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मावळ, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये शनिवारी (ता. ५) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बसरल्या. फुलोऱ्यात आलेल्या भात पिकासाठी रब्बी परेण्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत झालेल्या वादळी पावसाने कांदा रोपे, सोयबीन, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पावसाने दणका दिल्याने नुकसान वाढणार आहे. 

पुणे  : जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मावळ, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये शनिवारी (ता. ५) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बसरल्या. फुलोऱ्यात आलेल्या भात पिकासाठी रब्बी परेण्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत झालेल्या वादळी पावसाने कांदा रोपे, सोयबीन, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पावसाने दणका दिल्याने नुकसान वाढणार आहे. 

जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात सलग दोन दिवस झालेल्या पावसाने शेतीमालाचे नुकसान झाले. उगवून आलेली कांदा रोपे या मुसळधार पावसाने वाया जाणार असून, लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सोयाबीनच्या उत्पादनातही मोठी घट होणार आहे. कारण, पावसाचे पाणी शेतात साठून सोयाबीन सडू लागले आहेत. काकडी, मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोंथिबीर, झेंडू, शेवंती व इतर फुले यांचेही मोठे नुकसान झाले आहे. काही भागांत वादळी वाऱ्यात झाडे पडून काही काळ वाहतूक विस्कळित झाल्याच्या घटना घडल्या आहेत.मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक परिसराला विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपले. कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांची आणि रानात गुरे चारणाऱ्या गुराख्यांची मोठी तारांबळ उडाली.

दिवसभर वातावरणात गारवा होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडाटात पावसाला जोरात सुरवात झाली. पावसाचा तासभर जोर होता. कामशेत शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे पाऊण तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर तसेच शेतात पाणीच पाणी झाले. सध्या भाताचे पीक हे ओंब्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. भातासाठी तसेच उसाला हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. शुक्रवारी (ता. ४) हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा येथे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून शिवाजी विलास टकले यांच्या दोन बकऱ्या आणि अकरा शेळ्या ठार झाल्या. 
 
रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटर) (स्रोत - महसूल विभाग)  : घोटावडे १४, माले ३१, आंबवडे ११, वडगाव मावळ ३०, जुन्नर ११, बेल्हे ६१, राजूर १०, आपटाळे ३५, ओतूर १०, घोडेगाव २०, आंबेगाव (डिंभे) १७, शिरूर १०, बारामती ३५, माळेगाव ४७, पणदरे ४०, वडगाव ३५, लोणी भापकर ३५, मोरगाव १०, अंथुर्णे २५, रावणगाव ११, सासवड १५, परिंचे १३.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड  : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड,...
मनमाड बाजार समितीमध्ये नवीन मका विक्री...नाशिक : नांदगाव तालुक्यात मका काढणीला सुरवात झाली...
खरीप मळण्यांना पावसाचा फटकाकोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात...
शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल...नाशिक : मालेगाव तालुक्यातील विराणे येथील शेतकरी...
खानदेशात ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी...जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका...
व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदीनांदुरा, जि. बुलडाणा : पावसाने उघडीप दिल्याने...
‘पंदेकृवि’मध्ये जागतिक कापूस दिन साजराअकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात...
को-मार्केटिंगची पायाभरणी करणारा माजी...पुणे : "राज्यातील शेतकऱ्यांना को-मार्केटिंगच्या...
ग्रामपंचायत केंद्रचालकांचे मानधन...पुणे : राज्यातील हजारो ग्रामपंचायतींमधील...
मूल्यवर्धनासह पीकनिहाय गुंतवणुकीची गरज...ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे...
ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन शहर वा गाव कोणतंही असो, सांडपाणी व्यवस्थापनाचे...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍...महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील हवेचा दाब...
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात पीकविमा...अकोला  ः खरीप हंगामात राबविल्या जात असलेल्या...
ताप, अंगदुखीवर चुंच उपयुक्त स्थानिक नाव      चुंच,...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
खानदेशात उडदाचे एकरी एक क्विंटलपर्यंत...जळगाव ः खानदेशातील शेतकऱ्यांसाठी उडदाचे पीक यंदा...
समुद्रात जाणारे पाणी वळवून वाद मिटवणारः...नगर : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी...
वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विद्युत ऊर्जा...कारचा एक्झॉस्ट पाइप, औद्योगिक प्रक्रियामध्ये...
पुणे जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका सुरूचपुणे : पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत...
नाशिक जिल्ह्यातील वागदर्डी धरण चार...नाशिक : मागील महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे...