Agriculture news in marathi Stormy rain hit Karjat, Shrigonda taluka | Agrowon

कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात वादळी पावसाचा फटका 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

नगर ः कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात रविवारी (ता. १९) सायंकाळी जोरदार गारांसह वादळी पाऊस झाला. या पावसाचा पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला आहे. द्राक्ष, संत्रा, मोसबी फळबागांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. 

नगर ः कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात रविवारी (ता. १९) सायंकाळी जोरदार गारांसह वादळी पाऊस झाला. या पावसाचा पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला आहे. द्राक्ष, संत्रा, मोसबी फळबागांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. 

नगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यातील शेडगावसह दहा गावांच्या परिसरात तर कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रीक, ताजू, तळवडी, कुळधरण, जलालपूर, घोगरगाव परिसरात रविवारी रात्री जोरदार वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. यात चारापिकांसह भाजीपाला, फळांचे नुकसान झाले.

स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. एकतर लाॅकडाऊनमुळे भाजीपाला, फळे विकण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असताना त्यात अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

मागील महिन्यातही झालेल्या पावसाने या भागाला चांगलाच फटका बसला होता. आता या पावसाने मोसंबी, संत्रा आणि द्राक्षबागांचे दोन्हीही तालुक्यात नुकसान झाले. 
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...